AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केळी, कोरफड आणि बेसन पीठाचा फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा

त्वचा चांगली नसेल तर चेहऱ्यावरचा मेकअप फार चांगला दिसत नाही. आपली त्वचा चमकदार आणि चांगली तुम्हाला दिसावी वाटत असेल तर आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्या.

केळी, कोरफड आणि बेसन पीठाचा फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा
सुंदर त्वचा
| Edited By: | Updated on: Jun 17, 2021 | 5:53 PM
Share

मुंबई : त्वचा चांगली नसेल तर चेहऱ्यावरचा मेकअप फार चांगला दिसत नाही. आपली त्वचा चमकदार आणि चांगली तुम्हाला दिसावी वाटत असेल तर आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्या. दरवेळी बाजारातून महागडे उत्पादने आणून वापरून आपली त्वचा काही काळासाठी चांगली होते. मात्र, जर तुम्हाला कायमसाठी त्वचा चांगली पाहिजे असेल तर चला, या काही घरगुती टिप्स फाॅलो करा. (Face pack of banana and aloe is beneficial for the skin)

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण घरच्या घरी केळी आणि कोरफडचा फेसपॅक तयार करू शकतो. यासाठी आपल्याला अर्धी केळी, गुलाब, पाणी, हळद, कोरफड आणि बेसन लागणार आहे. केळी मॅश करून त्यामध्ये कोरफडीचा गर मिक्स करा. यानंतर त्यामध्ये वरील सर्व साहित्य मिक्स करा आणि चांगली पेस्ट तयार करा. हा फेसपॅक साधारण वीस ते तीस मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्याला लावा. त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा.

हा फेसपॅक आपण दररोज आपल्या चेहऱ्याला लावू शकतो. यामुळे आपली त्वचा सुंदर आणि तजेलदार होण्यास मदत होईल. अर्धी केळी, अर्धा लिंबू प्रथम केळी मॅश करून पेस्ट बनवा. आता या पेस्टमध्ये लिंबू पिळून घ्या. तयार मिश्रणाने बाधित त्वचेची मालिश 5 ते 7 मिनिटे आणि नंतर 15 मिनिटांवर ठेवा. त्यानंतर ते ताजे पाण्याने धुवा आणि ते स्वच्छ करा. आपण दररोज वापरू शकता. कलिंगड आणि काकडीचा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला कलिंगड आणि काकडीचा रस लागणार आहे.

ते दोन्ही रस व्यवस्थितपणे एकत्र मिक्स करा आणि चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे ठेवा आणि थंड पाण्याने धुवा. त्वचा निरोगी आणि चमकदार होण्यासाठी नेहमी व्यायाम करण्याची सवय लावून घ्या. कसरत करण्याची सवय कधीही सोडू नका. दररोज किमान 30 ते 45 मिनिटे कसरत आणि व्यायामामुळे तुमचे रक्त परिसंचरण वाढते. परिणामी हृदयाचची गती वाढते आणि शरीरातून घाम निघून जातो. या घामातून अतिरिक्त चरबी निघून गेल्याने शरीर निरोगी होते. तसेच, आपल्याला चमकणारी आणि निरोगी त्वचा प्राप्त होते. व्यायामामुळे त्वचेतील कोलेजेनचे उत्पादन सुधारते.

(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Papaya | पपईचे अतिसेवन शरीरासाठी घातक, अनेक आजारांना मिळेल निमंत्रण!

Beauty Tips | काजळ लावताना ते पसरण्याची भीती वाटतेय? मग ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स!

(Face pack of banana and aloe is beneficial for the skin)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली