हृदयविकाराचा धोका रोखण्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत कडीपत्ता अत्यंत फायदेशीर, वाचा!

कढीपत्ता जवळपास सर्वच स्वयंपाक घरामध्ये आढळतो. कढीपत्त्याच्या पानांचा उपयोग जेवणाची चव वाढविण्यासाठी केल्या जातो.

  • Updated On - 11:48 am, Thu, 13 May 21 Edited By: Anish Bendre
हृदयविकाराचा धोका रोखण्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत कडीपत्ता अत्यंत फायदेशीर, वाचा!
कढीपत्त्याची पाने

मुंबई : कढीपत्ता जवळपास सर्वच स्वयंपाक घरामध्ये आढळतो. कढीपत्त्याच्या पानांचा उपयोग जेवणाची चव वाढविण्यासाठी केल्या जातो. चवीसाठी तर याचा वापर होतोच; परंतु त्याचबरोबर कढीपत्त्याची पाने अतिशय औषधी असतात. याला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध असल्यामुळे निरनिराळ्या चटण्यामध्ये, भाज्यांमध्ये व मसाल्यामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. मात्र, कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. (Curry leave cures many diseases)

अनेक रोगांवर कढीपत्ता रामबाण उपाय आहे. शिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कढीपत्ता खूप फायदेशीर आहे. कढीपत्यामध्ये कॅल्शियम, फायबर, प्रथिने आणि जीवनसत्त्वे यासह बरेच पौष्टिक घटक आहेत. कढीपत्ता केस आणि त्वचेसाठी देखील लाभदायी आहे. वारंवार तोंडाचे फोड येत असल्यास कढीपत्त्यामध्ये मध मिसळून त्याची पेस्ट बनवा. हे मिश्रण तोंडाच्या अल्सरवर लावल्यास 2-3 दिवसात आराम मिळेल. कढीपत्त्यात असलेले फायबर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते. या व्यतिरिक्त हे पाचन तंत्रास देखील बळकट करते.

कढीपत्त्याचे सेवन केल्यास हृदय व रक्तवाहिन्यांचा धोका कमी होतो. यासाठी दररोज 8 ते 10 कढीपत्ता किंवा रस प्या. कढीपत्त्यात औषधी गुणधर्म असतात. दररोज कढीपत्त्याचा समावेश आपल्या आहारात केलातर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास नक्की मदत होईल. कढीपत्ता आयुर्वेदिक औषधांमध्येही मोठ्या प्रमाणात वापरला जातो. कढीपत्त्यामध्ये जीवनसत्त्वे अ, बी, सी, बी 12, लोह आणि कॅल्शियम यासारखे पोषक घटक असतात. त्यात अँटी बॅक्टेरिया, एंटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट्स हे देखील आहेत.

4 ते 5 कढीपत्ताची पाने, 4 ते 5 तुळशीची पाने यांची पेस्ट तयार करून त्यात एक चमचा मध मिक्स करा आणि पेस्ट तयार करा. तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे खाल्ले पाहिजे. हे रोगांशी लढायला आणि संक्रमणापासून संरक्षण करण्यास मदत करेल. बहुतेक लोकांना गडद आणि दाट केस आवडतात. परंतु योग्य काळजी न घेतल्यामुळे, केस गळणे ही समस्या सामान्य झाले आहे. जर, आपल्यालाही केस गळून पडण्याची समस्या उद्भवत असेल, तर नारळ तेलात कढीपत्ता आणि आवळा घाला. तेलाचा रंग काळा होईपर्यंत हे तेल मिश्रण उकळवा. थंड झाल्यावर स्काल्प आणि केसांच्या मुळांवर हे तेल लावा.

(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Papaya | पपईचे अतिसेवन शरीरासाठी घातक, अनेक आजारांना मिळेल निमंत्रण!

(Curry leave cures many diseases)