AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झटपट तयार करा साबुदाण्याच्या ‘या’ चार टेस्टी डिश, पाहा रेसिपी !

बऱ्याच लोकांना नाश्त्यामध्ये विविध पदार्थ खाण्यासाठी आवडतात. नाश्त्यामध्ये दररोजचेच पदार्थ खाऊन बोर होते.

झटपट तयार करा साबुदाण्याच्या 'या' चार टेस्टी डिश, पाहा रेसिपी !
| Updated on: Apr 20, 2021 | 9:40 AM
Share

मुंबई : बऱ्याच लोकांना नाश्त्यामध्ये विविध पदार्थ खाण्यासाठी आवडतात. नाश्त्यामध्ये दररोजचेच पदार्थ खाऊन बोर होते. मात्र, सकाळी कामाच्या गडबडीत स्पेशल नाश्ता करण्यासाठी म्हणावा तेवढा वेळ सुध्दा नसतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही डिश सांगणार आहोत. त्या तयार करण्यासाठी फक्त पाच ते दहा मिनिटांचा कालावधी लागतो आणि हेल्ही सुध्दा आहेत. चला तर मग बघूयात नेमक्या या कुढल्या डिश आहेत. (Make a tasty dish of sago at home)

साबुदाना खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आपल्या शरीराला पाहिजे असलेले अनेक पोषक घटक साबुदाण्यामध्ये आढळतात. यामुळे सकाळी नाश्त्यामध्ये साबुदाणा खाणे चांगले आहे. शिवाय साबुदाणा खाल्ल्याने आपले पोट बऱ्याच वेळ भरल्यासारखे वाढते. यामुळे जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी साबुदाणा खावा कारण साबुदाणा खाल्ल्याने बराच वेळ भुक देखील लागत नाही.

साबुदाणा खिचडी सकाळच्या नाश्त्यामध्ये साबुदाणा खिचडी हा एक चांगला पर्याय आहे. साबुदाणा खिचडीमध्ये शेंगदाणे, बटाटे आणि साबुदाणा असतो. हा नाश्ता शरीरासाठी खूप हलका आणि फायदेशीर असतो. त्यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आहे. साबूची खिचडी बनविण्यात जास्त वेळ लागत नाही आणि यामुळे तुमची भूक शांत होईल. यामुळे सकाळच्या नाश्त्यामध्ये साबुदाणा खिचडी खाणे कधीही चांगले

साबुदाणा वडा हा एक संध्याकाळच्या वेळीचा नाश्ता आहे. भाजलेली शेंगदाणे, चिरलेली हिरवी मिरची, चिरलेली कांदे, उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे घालून भिजवलेल्या साबुदाणामध्ये मिक्स करावे. थोडीशी लाल तिखट आणि मीठ घालून या मिश्रणाचे छोट-छोटे गोळे करा आणि आणि तेलात तळा.

साबुदाणा खीर कढईत 1 कप दूध घ्या आणि त्यात साबूदाणा मिक्स करा. साखर, वेलची पावडर आणि केशर मिक्स करावे. मध्यम आचेवर शिजू द्यावे आणि 5 मिनिटे ढवळत रहा. आता गरमा गरम खीर सर्व्ह करा.

साबुदाणा चिवडा शेंगदाणे, काजू आणि मनुके तेलात भाजून घ्या. एका भांड्यात हे तळलेले शेंगदाणे आणि साबुदाणा एकत्र करा आणि त्यात थोडे मीठ, लाल तिखट आणि चिमूटभर साखर घाला. चांगले मिसळा आणि सर्व्ह करा.

टिप साबुदाण्याची कोणतीही डिश तयार करण्याच्या अगोदर साबुदाणा किमान सहा तास अगोदर भिजवून ठेवा. यामुळे साबुदाणा नरम पडतो.

संबंधित बातम्या : 

Healthy Diet | डाएटमध्ये करा हिरव्या भाज्यांचा समावेश, होतील अनेक फायदे!

Papaya | पपईचे अतिसेवन शरीरासाठी घातक, अनेक आजारांना मिळेल निमंत्रण!

(Make a tasty dish of sago at home)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.