
डोळ्यांखालील डार्क सर्कल ही एक सामान्य समस्या आहे जी कोणालाही त्रास देऊ शकते. ही समस्या केवळ चेहऱ्याचे सौंदर्य कमी करत नाही तर यामुळे तुम्ही नेहमीच थकलेले दिसता. तर डोळ्यांखालील डार्क सर्कल येण्यामागे अनेक कारणे असू शकतात, जसे की झोपेचा अभाव, ताणतणाव, वेळेवर आहार न घेणे किंवा शरीरात पाण्याची कमतरता. पण आता काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही काही सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करून या डार्क सर्कलपासून मुक्त होऊ शकता. चला तर मग आजच्या या लेखात आपण डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्याचे 5 प्रभावी मार्ग जाणून घेऊयात.
थंड पदार्थ डोळ्यांखालील सूज आणि डार्क सर्कल कमी करण्यास मदत करतात. यासाठी एक चमचा घ्या आणि तो काही मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर थंड झालेला चमचा डोळ्यांखाली हलका फिरवा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते.
काकडी आणि बटाटा दोन्ही नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करतात. त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी त्वचेला पोषण देतात. यासाठी काकडी किंवा बटाट्याचे पातळ काप करा आणि ते डोळ्यांवर 10-15 मिनिटे ठेवा. तुम्ही हे नियमित केल्याने डार्क सर्कल कमी होण्यास सुरुवात होईल.
बदाम तेलात व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांखालील भागावर बदाम तेलाने हलके मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारेल आणि डार्क सर्कल हळूहळू कमी होतील.
गुलाबपाणी त्वचेला थंड आणि ताजेतवाने करते, तर ग्लिसरीन त्वचेला मॉइश्चरायझ करते . तर हे दोन्ही गोष्टी समान प्रमाणात मिक्स करा आणि कापसाच्या मदतीने डोळ्यांखाली लावा. 15 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. ही पद्धत डार्क सर्कल कमी करते तसेच त्वचा चमकदार बनवते.
डार्क सर्कल येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे झोपेचा अभाव आणि डिहायड्रेशन. म्हणून ते कमी करण्यासाठी दररोज 7-8 तासांची चांगली झोप घ्या आणि भरपूर पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि त्वचा निरोगी राहते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)