Hair Care Tips : केसांच्या सर्व समस्यांवर उपाय आहे रिठा-आवळा आणि शिककाई; जाणून घ्या, त्याचे फायदे आणि वापरण्याची पद्धत!

रिठा-आवळा आणि शिककाई ही नैसर्गिक औषधी वनस्पती आहेत. ज्याचा वापर केसांमध्ये वर्षानुवर्षे केला जात आहे. केसांच्या वाढीसाठी रीठा, आवळा, शिककाई हे खूप चांगले मानले जाते. जाणून घ्या, त्याचे फायदे आणि त्याचा वापर कसा करायचा.

Hair Care Tips : केसांच्या सर्व समस्यांवर उपाय आहे रिठा-आवळा आणि शिककाई; जाणून घ्या, त्याचे फायदे आणि वापरण्याची पद्धत!
केसांच्या सर्व समस्यांवर उपाय आहे रिठा-आवळा आणि शिककाई; जाणून घ्या, त्याचे फायदे आणि वापरण्याची पद्धत!Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 9:49 PM

रिठा-आवळा आणि शिककाई या अशा गोष्टी आहेत. ज्या आपल्या आजी-आजोबांच्या काळापासून वापरल्या जात आहेत. पूर्वीच्या काळी केस काळे, दाट आणि लांब करण्यासाठी याचा वापर केला जात असे. आजकाल तुम्ही कितीही महागडे शॅम्पू वापरत असलात तरी, सर्वांमध्ये केमिकलचा वापर (Use of chemicals) केला जातो. त्यामुळे केसांना एकप्रकारे नुकसान होते. पण रिठा-आवळा आणि शिककाई ही औषधी वनस्पती (Medicinal plants) आहेत, ज्याचा नैसर्गिकरित्या केसांना फायदा होतो. केसांमध्ये त्यांचा वापर केल्याने केसांचे आरोग्य काही दिवसांतच सुधारू लागते, असे म्हणतात. तसेच, यामुळे सर्व अकाली समस्यांपासून (premature problems) आराम मिळतो. केसांच्या वाढीसाठी रीठा, आवळा, शिककाई हे खूप चांगले मानले जाते. जाणून घ्या, त्याचे फायदे आणि त्याचा वापर कसा करायचा.

केस गळणे थांबविते

केस गळण्याची समस्या आजकाल सामान्य झाली आहे. याचे कारण चुकीचे अन्न, रासायनिक पदार्थांचा वापर, गरम करणाऱ्या साधनांचा अतिवापर आणि प्रदूषण इत्यादी मानले जाते. पावसाळ्यात ही समस्या अधिकच बिकट होते. जर तुम्ही रिठा-आवळा आणि शिककाईचा वापर केला तर तुमची समस्या बर्‍याच अंशी आटोक्यात येऊ शकते. रिठा-आवळा आणि शिककाई देखील केसांची वाढ सुधारतात आणि केस निरोगी करतात.

केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध करते

जरी तुमचे केस वेळेपूर्वी पांढरे होऊ लागले असतील, तर रिठा-आवळा आणि शिककाई तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहेत. या तीन औषधी वनस्पतींचे मिश्रण केस काळे ठेवण्यासाठी उपयुक्त मानले जाते. हे तुमच्या पांढर्‍या केसांची वाढ थांबवते. यामुळे अवेळी पांढऱ्या केसांची समस्या आटोक्यात येते.

डोक्यातील कोंडा आणि दुतोंडी केसांपासून मुक्ती

रिठा-आवळा आणि शिककाईमुळे केसांमधील कोंड्याची समस्याही दूर होते. याशिवाय स्प्लिट एंड्समुळे केसांची समस्याही दूर होते. ते लावल्याने केसांना पोषण मिळते. केस चमकदार आणि मजबूत होतात.

वापराची पद्धती

केसांच्या गरजेनुसार रिठा-आवळा आणि शिककाई समान प्रमाणात घ्या आणि थोडे पाणी घालून घट्ट पेस्ट बनवा. रात्रभर चांगले भिजू द्या. सकाळी हे मिश्रण केसांना लावा.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.