AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशाचा पहिला Travellator स्कायवॉक, एअरपोर्टप्रमाणे आरामात एण्ट्री, पाहा कुठे मिळणार ही लक्झरी सुविधा…

देशातील पहिल्या आणि एकमेव मोनोरेलला आता संत गाडगे महाराज चौक स्थानकात देशातला पहिला Travellator सुसज्ज स्कायवॉक बांधला जात आहे. त्यामुळे मोनोरेलचे कनेक्शन महालक्ष्मी रेल्वे स्थानक आणि मेट्रो तीनशी होणार आहे.

देशाचा पहिला Travellator स्कायवॉक, एअरपोर्टप्रमाणे आरामात एण्ट्री, पाहा कुठे मिळणार ही लक्झरी सुविधा...
India's First Travellator-Equipped Skywalk
| Updated on: Jul 26, 2026 | 5:42 PM
Share

मोनोरेलच्या चाचण्या सुरु असल्या तरी येत्या काही दिवसात चेंबुर ते सात रस्ता अशी मोनोरेल धावणार आहे. गेल्यावर्षी पावसाळ्यात मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शेकडो प्रवासी अडकले होते. या प्रवाशांना अखेर अग्निशमन दलाने काचा तोडून वाचवले होते. आता मोनोरेलमध्ये स्वदेशी रेक दाखल झाले असून सीबीटीसी सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. आणि लवकरच मोनोरेलची सेवा बहाली होणार आहे. मात्र, आता मोनोरेलच्या सातरस्ता ते महालक्ष्मी दरम्यान नवा स्काय वॉक बांधण्यात येणार आहे. हा देशातील पहिला Travellator सुसज्ज स्कायवॉक असणार आहे.

विमानतळावर ज्याप्रमाणे प्रवासी Travellator वर आरामात उभे असतात आणि पायाखालचा भाग पट्टा चालत रहातो, तशी हायफाय व्यवस्था सात रस्ता येथील मोनोरेल स्थानकातील  एमएमआरडीएच्या Travellator स्कायवॉकला असणार आहे. या अत्याधुनिक स्कायवॉकला मोनोरेल, मेट्रो तीन आणि उपनगरीय लोकल (महालक्ष्मी स्थानक )यांच्याशी कनेक्शन देण्यात येणार आहे.

महालक्ष्मी येथे मल्टीमोडल कनेक्टीव्हिटी प्रोजेक्ट अंतर्गत संत गाडगे महाराज चौक, मोनोरेल स्थानक, मेट्रो लाईन – ३ आणि महालक्ष्मी उपनगरीय स्थानकाला भारताचा पहिला ट्रॅव्हेलॅटर सुसज्ज स्काय वॉक असणार आहे. त्यामुळे एकदा हा Travellator स्कायवॉकला सुरु झाला तर इंटरचेंज प्रवासी अदलाबदलाचा वेग २० मिनिटांवर येणार आहे. मोनोरेलला त्यामुळे साऊथ मुंबई आणि वरळीशी जोडले जाणार आहे.

असा असणार ट्रॅव्हेलॅटर सुसज्ज स्काय वॉक

India's first travellator-equipped skywalk

India’s first travellator-equipped skywalk

Travellator

सुमारे २८३ मीटर लांबीचा एकात्मिक स्कायवॉक

* प्रवाशांच्या सुलभ हालचालीसाठी ११ मीटर रुंदीची रचना

* एकूण १७६ मीटर लांबीचे सहा ट्रॅव्हलेटर्स (चालते पट्टे)

* सर्वांसाठी सुलभ प्रवेशासाठी दोन प्रवासी लिफ्ट्स

* दर तासाला सुमारे ४,५०० प्रवाशांची क्षमता

येथे पोस्ट पाहा  –

Follow Us
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप