Lip Care : कोरड्या ओठांची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ 4 खास उपाय!

कोरड्या ओठांमुळे बरेच लोक त्रस्त आहेत आणि त्यावर उपचार करण्यासाठी अनेक गोष्टी करतात. कोरड्या ओठांची समस्या दूर करण्यासाठी बरेच लोक बाजारातून अनेक उत्पादने आणतात. मात्र, त्याचा म्हणावा तसा परिणाम दिसत नाही. परिणामी आपले ओठ कोरडेच होतात.

Lip Care : कोरड्या ओठांची समस्या दूर करण्यासाठी 'हे' 4 खास उपाय!
ओठांची काळजी

मुंबई : कोरड्या ओठांमुळे बरेच लोक त्रस्त आहेत आणि त्यावर उपचार करण्यासाठी अनेक गोष्टी करतात. कोरड्या ओठांची समस्या दूर करण्यासाठी बरेच लोक बाजारातून अनेक उत्पादने आणतात. मात्र, त्याचा म्हणावा तसा परिणाम दिसत नाही. परिणामी आपले ओठ कोरडेच होतात. जर तुम्हीही कोरड्या ओठांच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही काही घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे कोरड्या ओठांची समस्या दूर होईल. (Home remedies for dry lips are beneficial)

काकडी

काकडी हा व्हिटॅमिन सीचा एक समृद्ध स्त्रोत आहे. ओठांना मॉइस्चराइजिंग आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी काकडी फायदेशीर आहे. फक्त एक काकडी सोलून पातळ तुकडे करा. हे काप काही मिनिटांसाठी ओठांवर लावा. साधारण वीस मिनिटे ठेवा आणि धुवा. यामुळे ओठांचा कोरडेपणा दूर होण्यास मदत मिळते.

मध

ओठ कोरडे आणि निर्जीव होण्यापासून वाचवण्यासाठी मध खूप प्रभावी आहे. मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म आहे. थोडा घ्या आणि मध थेट ओठांवर लावा आणि नंतर काही मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. तसेच मध आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.

साखर

जर तुम्हाला तुमचे ओठ एक्सफोलिएट करायचे असतील आणि त्वचेच्या मृत पेशींपासून मुक्त व्हायचे असेल तर साखर हा सर्वात महत्वाचा घटक आहे. हे नैसर्गिक स्क्रबसारखे कार्य करते. मध किंवा ऑलिव्ह ऑईलमध्ये साखर मिसळा आणि हे मिश्रण ओठांवर लावा.

खोबरेल तेल

ओठ मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी नारळाचे तेल अत्यंत फायदेशीर आहे. हे ओठांना ओलावा प्रदान करते. तेलाचे काही थेंब तुमच्या बोटांवर घ्या आणि ते तुमच्या कोरड्या ओठांवर लावा. काही मिनिटे सोडा आणि नंतर पाण्याने धुवा. नारळाचे तेल शरीरासाठी नेहमीच चांगले असते. हे केसांसाठी जेवढे चांगले आहे तेवढेच त्वचेसाठीही चांगले आहे.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

सतत कोरड्या खोकल्याने हैराण आहात? जाणून घ्या कारण आणि या खोकल्यावरचे घरगुती उपाय

(Home remedies for dry lips are beneficial)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI