गर्भधारणेदरम्यान चालण्याचे बरेच फायदे , पण ‘या’ गोष्टींची काळजी घेणंही खूप महत्वाचं!

निरोगी गर्भधारणेसाठी निरोगी जीवनशैली असणे खूप महत्वाचे आहे. निरोगी जीवनशैलीचा अर्थ असा आहे की आपण आपला आहार चांगला ठेवा, म्हणजे शरीरात पोषणद्रव्यांची कमतरता भासत नाही.

गर्भधारणेदरम्यान चालण्याचे बरेच फायदे , पण 'या' गोष्टींची काळजी घेणंही खूप महत्वाचं!
गर्भधारणा

मुंबई : निरोगी गर्भधारणेसाठी निरोगी जीवनशैली असणे खूप महत्वाचे आहे. निरोगी जीवनशैलीचा अर्थ असा आहे की, आपण आपला आहार चांगला ठेवा, म्हणजे शरीरात पोषणद्रव्यांची कमतरता भासत नाही. तसेच शारीरिक हालचाली देखील चालू ठेवा. यामुळे गरोदरपणात जास्त त्रास होणार नाही. अशा परिस्थितीत चालणे हा एक उत्तम पर्याय आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की, जर गर्भधारणा सामान्य असेल तर 30 ते 45 मिनिटे चालण्याचा खूप फायदा होतो. (Walking during pregnancy is extremely beneficial)

1. गर्भधारणेदरम्यान चालणे सर्वोत्तम हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी व्यायाम मानला जातो. ही एक क्रिया आहे ज्यासाठी आपल्याला कोणताही पैसा खर्च करण्याची आवश्यकता नाही आणि आपण हे कधीही आणि कोठेही करू शकता.

2. चालण्यामुळे स्नायू बळकट होतात आणि गरोदरपणात बऱ्याच महिलांचे पाय सुजतात. चालण्याने पाय सुजण्याची समस्या कमी होते.

3. गर्भधारणेदरम्यान महिलांमध्ये गर्भलिंग मधुमेह होण्याचा धोका वाढतो, परंतु जर आपण दररोज चालत असाल तर ही समस्या टाळली जाते.

4. गरोदरपणात आजारपण, गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांवर चालणे हा एक उत्तम पर्याय आहे.

या गोष्टी लक्षात ठेवा

1. चालताना चांगल्या प्रतीचे शूज घाला, ज्यांची जमिनीवर चांगली पकड असेल आणि आपले पाय योग्यरित्या फिट होतील.

2. चालून परत येताना बर्‍याच वेळा उण पडते. यामुळे त्वचेची काळजी घ्या आणि सनस्क्रीन वापरा.

3. कधीही फिरायला एकटे जाऊ नका, कोणालाही आपल्याबरोबर सोबत घ्या. गर्भधारणेचा काळ खूपच नाजूक असतो, म्हणून आपल्या सुरक्षिततेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.

4. चालत असताना आपल्याबरोबर पिण्याचे पाणीसोबत राहूद्या. थोड्या वेळाने दोन घोट पाणी प्या, म्हणजे शरीराचे तापमान वाढत नाही.

5. चालण्यापूर्वी 30 मिनिटांपूर्वी कच्चे चीज, स्प्राउट्स इत्यादींसारख्या प्रथिनेयुक्त आहार घ्या.

6. चालण्यासाठी सकाळची वेळ निवडा आणि जास्तीत जास्त चाला. आपल्याला थकल्यासारखे किंवा श्वास घेताना थोड्या त्रास होत असेल तर थोडावेळ थांबा.

संबंधित बातम्या : 

Health Tips | अल्कोहोलबरोबर कधीही सेवन करू नका ‘हे’ पदार्थ, अन्यथा आरोग्याला होईल हानी!

सतत कोरड्या खोकल्याने हैराण आहात? जाणून घ्या कारण आणि या खोकल्यावरचे घरगुती उपाय

(Walking during pregnancy is extremely beneficial)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI