AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी करा ‘हा’ उपाय, लगेचच दिसतील परिणाम

पिवळ्या दातांसाठी संत्र्याची साल अतिशय प्रभावीपणे काम करते. संत्र्याच्या सालीत असणारे व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ॲसिड हे दात साफ करण्यास सुरुवात करतात.

दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी करा 'हा' उपाय, लगेचच दिसतील परिणाम
दात
| Updated on: Nov 12, 2024 | 3:26 PM
Share

Teeth Whitening Hack : आपल्या सर्वांच्या आरोग्याचा महत्वाचा घटक म्हणजे आपले दात. आपण हसताना कायम आपले दात दिसत असतात. आपले अधिक आरोग्य हे दातावर अवलंबून असते. आपल्या दातांच्या आरोग्याकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. आपण खाल्लेल्या पदार्थांचे तेल, मसाले दातांना चिकटू राहतात. नंतर कालांतराने ते पिवळे होऊन दातांवर जमा होऊ लागतात. मग आपल्या संपूर्ण दात पिवळा दिसू लागतो. त्यात तुम्ही जर दातांकडे वेळीच लक्ष दिले, नाहीतर दात दुखी, दात पिवळे पडणे, दुर्गंधी येणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी तुम्ही या सोप्या उपायांची मदत घेऊन दातांचा पिवळेपणा दूर करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात.

दातांचा पिवळसरपणा दूर करण्यासाठी तुम्ही संत्र्याच्या सालीचा वापर करू शकता. यासाठी संत्र्याची साल घेऊन दातांवर सर्व बाजूंनी घासून दात स्वच्छ करा. यानंतर ब्रश करा. असे केल्याने दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत होते व दात चांगले स्वच्छ होतात.

संत्र्याची साल घेऊन त्याची बारीक पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये थोडे मीठ आणि मोहरीचे तेल घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर ब्रशच्या साहाय्याने तयार केलेली पेस्ट दातांवर लावा आणि दात स्वच्छ करा. असे केल्याने दात चमकू लागतील आणि दातांवर साचलेली घाण साफ होईल.

संत्र्याची साल का फायदेशीर?

पिवळ्या दातांसाठी संत्र्याची साल अतिशय प्रभावीपणे काम करते. संत्र्याच्या सालीत असणारे व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ॲसिड हे दात साफ करण्यास सुरुवात करतात. यामुळे पिवळे दात साफ होण्यास मदत होते. तसेच तोंडातील बॅक्टेरिया स्वच्छ होतात आणि तुमच्या तोंडाचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे फक्त संत्र्याची साल घ्या आणि त्यापासून दात स्वच्छ करा. यापुढे संत्र्याची साल फेकून देण्याऐवजी दात स्वच्छ करण्यासाठी त्याचा वापर करू शकता. त्यामुळे या टिप्स कधीतरी ट्राय करून बघा.

सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली.
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.