AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दूध आणि हळदीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्याच्या सर्व समस्या काही मिनिटांमध्ये दूर करा! 

चेहरा सुंदर, चमकदार दिसावा म्हणून बरेच लोक दोन पद्धती वापरतात. पहिली म्हणजे ब्युटी क्रिमचा वापर आणि दुसरी म्हणजे ब्लीचिंग.

दूध आणि हळदीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्याच्या सर्व समस्या काही मिनिटांमध्ये दूर करा! 
फेसपॅक
| Edited By: | Updated on: Jul 06, 2021 | 5:17 PM
Share

मुंबई : चेहरा सुंदर, चमकदार दिसावा म्हणून बरेच लोक दोन पद्धती वापरतात. पहिली म्हणजे ब्युटी क्रिमचा वापर आणि दुसरी म्हणजे ब्लीचिंग. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की, बाजारात उपलब्ध असलेल्या या ब्लिचमध्ये असलेली रसायने आपल्या त्वचेचे नुकसान करू शकतात. इतकेच नाही तर या उत्पादनांचा नियमित वापर केल्यास तुम्हाला त्वचेच्या अनेक दीर्घकालीन समस्या देखील येऊ शकतात. (Milk and turmeric paste are extremely beneficial for the skin)

यामुळे आपण काही घरगुती उपाय करून सुंदर त्वचा मिळू शकतात. घरच्या घरी ब्लीच तयार करण्यासाठी आपल्याला दूध आणि हळद लागणार आहे. तीन चमचे दूधामध्ये दोन चमचे हळद मिक्स करा आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. ही पेस्ट अर्धा तासांसाठी आपल्या चेहऱ्यावर तशीच ठेवा आणि त्यानंतर चेहऱ्याचा मसाज करा. कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. हे घरगुती ब्लीच आपण आठ दिवसांमधून तीन-चार वेळा चेहऱ्याला लावले पाहिजे. यामुळे आपला चेहरा चमकदार दिसतो.

सर्व प्रथम एका भांड्यात 1 चमचे चंदन पावडर घ्या. त्यात 2 चमचे पाणी घाला. दोन्ही गोष्टी चांगल्या मिसळा. चंदन पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने त्वचा थंड होते आणि चेहर्‍यावरील डाग कमी होतात. चंदनामुळे त्वचेत मेलेनिन वाढण्यास मदत होते, ज्यामुळे त्वचा तंदुरुस्त राहते. आपल्या चेहऱ्यावर कॉटन स्पंजच्या सहाय्याने तयार मिश्रण लावा. ही पेस्ट फक्त चेहर्‍यावर मर्यादीत ठेवण्यापेक्षा गळ्यावरही लावणे चांगले. जेणेकरून त्वचेला एकसारखा उजळपणा येईल.

जर, कॉटन स्पंजच्या सहाय्याने लावण्यास त्रास होत असेल, तर आपण ही पेस्ट हाताने देखील त्वचेवर लावू शकता. आपण तिळाच्या तेलानी रोज मालिश करायला पाहिजे. चेहऱ्याच्या त्वचेवरील अस्वच्छता साफ करण्यासाठी तिळाच्या तेलाची मदत होते. या तेलामुळे चेहऱ्यावरील डाग देखील निघून जातात. दररोज रात्री झोपताना तिळाच्या तेलाने मालिश करावी आणि सकाळी पाण्याने धुवावे. जर तुमच्या चेहऱ्यावरील त्वचा कोरडी पडत असल्यास ताज्या दुधावरची मलई चेहऱ्यावर लावावी. त्यानंतर हलक्या हातांनी चेहऱ्याला मालिश करावी.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Milk and turmeric paste are extremely beneficial for the skin)

Follow Us
मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा निर्णय
Mumbai Water Cut | मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! धरणसाठा 88.70% वर; पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा मोठा निर्णय
मोठी घडामोड! सुप्रिया सुळे 8 खासदारांसह पंतप्रधान मोदींना भेटणार
मोठी घडामोड! सुप्रिया सुळे 8 खासदारांसह पंतप्रधान मोदींना भेटणार; आज दिल्लीच्या बैठकीत काय निर्णय होणार?
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर