Skin Care : पुदीना आणि दह्याचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 09, 2021 | 3:10 PM

आपल्याला जर सुंदर त्वचा पाहिजे असेल तर आपण जास्तीत-जास्त घरगुती उपाय करण्यावर भर दिला पाहिजे. ज्यामुळे आपली त्वचा नेहमीसाठीच सुंदर आणि चमकदार बनेल.

Skin Care : पुदीना आणि दह्याचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!
फेसपॅक
Follow us

मुंबई : आपल्याला जर सुंदर त्वचा पाहिजे असेल तर आपण जास्तीत-जास्त घरगुती उपाय करण्यावर भर दिला पाहिजे. ज्यामुळे आपली त्वचा नेहमीसाठीच सुंदर आणि चमकदार बनेल. विशेष म्हणजे घरगुती उपाय करताना आपल्याला काही खर्च देखील येत नाही. पुदीना आणि दही जसे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच ते आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. (Peppermint  and curd face packs are extremely beneficial for the skin)

आपण जर दही आणि पुदीन्याच्या पानांचा फेसपॅक घरी तयार केला तर आपली त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला दहा ते बारा पुदीन्याची पाने आणि चार ते पाच चमचे दही लागणार आहे. सर्वात अगोदर पुदीन्याच्या पानांची चांगली पेस्ट तयार करून घ्या आणि त्यामध्ये दही मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. साधारण वीस मिनिटांनंतर आपला चेहरा कोमट पाण्याने धुवा.

हा फेसपॅक आपण आठ दिवसांमधून तीन चे चार वेळा लावला पाहिजे. या फेसपॅकमुळे आपली त्वचा तजेलदार दिसण्यास मदत होते. काकडी आणि पुदीना देखील आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. काकडी आणि पुदिन्याची चांगली पेस्ट तयार करा आणि त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर तशीच ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

दही आणि बेसन पीठाचा फेसपॅक लावणे खूप फायदेशीर आहे. या दोन गोष्टी समान प्रमाणात मिसळा आणि पेस्ट बनवा आणि नंतर चेहऱ्यावर लावा. यानंतर ते मिश्रण पाण्याने धुवून घ्या. अंड्यातील फक्त पिवळा बलकमध्ये एक चमचा मध मिसळा. हे मिश्रण चेहर्‍यावर लावा आणि नंतर ते पाण्याने धुवा. त्यात असलेले मध त्वचेला मॉइश्चराइझ ठेवते. हा पॅक वापरल्यानंतर तुमची त्वचा मऊ आणि चमकदार होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Peppermint  and curd face packs are extremely beneficial for the skin)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI