AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्लॅकहेड्स काढण्यासाठी ‘हे’ घरगुती फेस मास्क वापरून पहा, पहिल्याच वापरात दिसून येईल परिणाम

ब्लॅकहेड्सची समस्या पुरुष आणि महिलांमध्ये सामान्य झाली आहे. कारण प्रदूषण आणि धुळीमुळे ब्लॅकहेड्सची समस्या निर्माण होत असते. ब्लॅकहेड्स काढण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे मास्क मिळतात. परंतु तुम्ही घरी नैसर्गिक पद्धतीने मास्क बनवून ब्लॅकहेड्स काढू शकता. ते कसे बनवायचे आणि कसे वापरायचे हे आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात.

ब्लॅकहेड्स काढण्यासाठी 'हे' घरगुती फेस मास्क वापरून पहा, पहिल्याच वापरात दिसून येईल परिणाम
face mask
| Edited By: | Updated on: Jun 21, 2025 | 7:40 PM
Share

आजच्या या धावपळीच्या जीवनात अनेकांना चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात आणि मग आपण आपल्या त्वचेच्या काळजीबाबत अधिक जागरूक होतो. असच काहीस आपल्या त्वचेवर येणाऱ्या ब्लॅकहेड्सचं आहे. कारण त्वचेवर असणाऱ्या छिद्रांमधून बाहेर येणारे सेबम घटक जेव्हा हवेच्या संर्पकात येते तेव्हा रिॲक्शन होऊन ब्लॅकहेड्स तयार होतात.

तर चेहऱ्यावरील छोटे काळे डाग ज्यांना आपण ब्लॅकहेड्स म्हणतो, ते तुमच्या त्वचेचे सौंदर्यच बिघडवत नाहीत तर तुमचा आत्मविश्वासही कमी करतात. ब्लॅकहेड्स हे नाक, हनुवटी आणि कपाळावर तयार होतात. तसेच ज्यांची त्वचा तेलकट किंवा कॉम्बिनेशन प्रकारची असते त्यांच्यासाठी ही एक सामान्य समस्या आहे. बरेच लोकं पार्लरमध्ये जातात आणि महागडे उपचार घेतात किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या स्ट्रिप्स आणि मास्कचा वापर करतात. पण बाजारातून आणलेल्या प्रोडक्सचे वापर करता तेव्हा ते ठरविक काळानंतर कधीकधी त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात.

तर हे ब्लॅकहेड्स काढून टाकण्यासाठी तुम्ही घरी काही सोप्या आणि नैसर्गिक गोष्टींचा वापर करून फेस मास्क बनवू शकता, तसेच या मास्कच्या मदतीने ब्लॅकहेड्स मुळापासून स्वच्छ करू शकता, तेही कोणत्याही दुष्परिणामांशिवाय. तर या लेखात, आम्ही तुम्हाला अशा 3 प्रभावी घरगुती फेस मास्कबद्दल सांगू जे केवळ ब्लॅकहेड्स काढून टाकत नाहीत तर त्वचेला खोलवर स्वच्छ करतात आणि त्वचा मऊ, स्वच्छ आणि निरोगी बनवतात.

1. बेसन आणि हळदीचा मास्क

बेसन आणि हळदीचा मास्क त्वचेला एक्सफोलिएट करतो, अतिरिक्त तेल काढून टाकतो आणि मृत त्वचा देखील स्वच्छ करतो. तर बेसन आणि हळदीचा मास्क बनवण्यासाठी, 1 टेबलस्पून बेसन, 1/4 टीस्पून हळद आणि 1 टीस्पून दही किंवा गुलाबपाणी घ्या आणि हे सर्व मिश्रण एकत्र मिक्स करा. तर हे मिश्रण बनवताना पेस्ट घट्ट ठेवा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा जेणेकरून छिद्रे उघडतील. आता हा मास्क नाक, हनुवटी आणि ब्लॅकहेड्स असलेल्या भागांवर लावा. सुकल्यानंतर, हलक्या हाताने स्क्रब करून स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोनदा असे केल्याने तुमचे ब्लॅकहेड्स निघून जातील.

2. चारकोल आणि कोरफड जेल मास्क

हा मास्क केवळ ब्लॅकहेड्सच नाही तर त्वचा स्वच्छ करतो. तर या मास्कमध्ये वापरलेले चारकोल त्वचेला खोलवर स्वच्छ करतो आणि ब्लॅकहेड्स काढून टाकतो, तर कोरफड जेल जळजळ शांत करते. तर हा मास्क बनवण्यासाठी 1 कॅप्सूल चारकोल, 1 चमचा कोरफड जेल आणि 2-3 थेंब लिंबाचा रस आता हे सर्व एकत्र मिक्स करा. आता हा मास्क ब्लॅकहेड्स असलेल्या भागावर लावा. सुकल्यानंतर, मास्क पुसून टाका किंवा कोमट पाण्याने धुवा. तुम्हाला पहिल्या वापरातच तुम्हाला त्याचा परिणाम दिसून येईल.

3. अंड्याचा पांढरा भाग आणि टिश्यू पेपर मास्क

हा एक नैसर्गिक पील-ऑफ मास्क आहे जो ब्लॅकहेड्स, व्हाइटहेड्स आणि मृत त्वचा त्वरित काढून टाकतो. हा मास्क बनवण्यासाठी, तुम्हाला 1 अंड्याचा पांढरा भाग आणि टिश्यू पेपर लागेल. आता अंड्याचा पांढरा भाग फेटून घ्या आणि ब्लॅकहेड्स असलेल्या भागावर लावाताच त्यावर लगेच टिश्यू पेपर चिकटवा. त्यानंतर परत अंड्याचा पांढरा भाग टिश्यू पेपरच्या वर लावा. आता हा मास्‍‍क कोरडा झाल्यावर हळूहळू टिश्यू बाहेर काढा. लक्षात ठेवा की हा उपाय तुम्ही आठवड्यातून फक्त एकदाचा करू शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.