AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्यासाठी मिल्क पावडरचा फेसपॅक नक्की ट्राय करा! 

प्रत्येकाला सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. पण व्यस्त जीवनशैली, प्रदूषण आणि योग्य काळजी न घेतल्याने त्वचेच्या समस्या उद्भवतात. त्वचेवर लालसरपणा, कोरडेपणा, पुरळ आणि मुरुमांची समस्या वाढते. त्वचेला या समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी, योग्य काळजी आणि पोषण आवश्यक आहे.

Skin Care : त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्यासाठी मिल्क पावडरचा फेसपॅक नक्की ट्राय करा! 
त्वचा
| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 9:11 AM
Share

मुंबई : प्रत्येकाला सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. पण व्यस्त जीवनशैली, प्रदूषण आणि योग्य काळजी न घेतल्याने त्वचेच्या समस्या उद्भवतात. त्वचेवर लालसरपणा, कोरडेपणा, पुरळ आणि मुरुमांची समस्या वाढते. त्वचेला या समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी, योग्य काळजी आणि पोषण आवश्यक आहे. बरेच लोक घरगुती उपचारांचा अवलंब करतात. हे उपाय त्वचेला चमकदार ठेवण्यास मदत करतात.

त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी मिल्क पावडर वापरली जाऊ शकते. आपण चहा किंवा कॉफी बनवण्यासाठी मिल्क पावडर वापरतो. त्यात असलेले नैसर्गिक गुणधर्म त्वचेसाठी देखील फायदेशीर आहेत. हे त्वचेवरील डाग, टॅनिंगची समस्या दूर ठेवण्यास मदत करते. आपण ते स्क्रब, फेस मिस्ट आणि सीरम म्हणून वापरू शकता. त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. आपण मिल्क पावडर कशी वापरू शकतो ते जाणून घेऊयात.

स्क्रब म्हणून वापरा

त्वचेला चमकदार आणि सुंदर ठेवण्यासाठी मिल्क पावडर स्क्रब म्हणून वापरली जाऊ शकते. त्वचेची मृत त्वचा काढून त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत करते. त्याचे स्क्रब बनवण्यासाठी दोन चमचे मिल्क पावडर, अर्धा चमचा कॉफी पावडर आणि एक चमचा खोबरेल तेल मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून 5 ते 7 मिनिटे ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

अशाप्रकारे फेसपॅक बनवा

मिल्क पावडरचा फेसपॅक बनवण्यासाठी, दोन चमचे पावडर, दोन चमचे बेसन आणि दोन ते तीन चमचे गुलाबपाणी मिसळून जाड पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि 20 मिनिटे सोडा. नंतर ही पेस्ट पाण्याने धुवा. ही पेस्ट लावल्याने त्वचा उजळेल आणि टॅनिंगही जाईल.

फेस सीरम

फेस सीरम त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यास मदत करते. मिल्क पावडरपासून फेस सीरम बनवण्यासाठी, एक चमचे मिल्क पावडर आणि 2 ते 3 चमचे गुलाब पाणी घालून पेस्ट तयार करा. आता या पेस्टचे 3 ते 4 लेप कापसाच्या मदतीने लावा आणि नंतर काही वेळाने पाण्याने धुवा. हा उपाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावल्याने त्वचा सुधारेल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(The face pack of milk powder is extremely beneficial for the skin)

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी