Rose Petal Powder : गुलाब पाकळ्याच्या पावडरचे ‘हे’ फेसपॅक घरी तयार करा आणि चमकदार त्वचा मिळवा!

| Updated on: Jul 08, 2021 | 11:57 AM

निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी आपण होममेड फेसपॅक वापरू शकता. विशेष म्हणजे आपण गुलाबाच्या पाकळ्याच्या मदतीने फेसपॅक घरी तयार करू शकतो.

Rose Petal Powder : गुलाब पाकळ्याच्या पावडरचे हे फेसपॅक घरी तयार करा आणि चमकदार त्वचा मिळवा!
फेसपॅक
Follow us on

मुंबई : निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी आपण होममेड फेसपॅक वापरू शकता. विशेष म्हणजे आपण गुलाबाच्या पाकळ्याच्या मदतीने फेसपॅक घरी तयार करू शकतो. गुलाबाच्या पाकळ्या सुगंधांसह पोषक तत्वांनी समृद्ध असतात. गुलाबाच्या पाकळ्या त्वचेला नैसर्गिकरित्या चमकवण्यास मदत करतात. विशेष म्हणजे आपण गुलाबच्या पाकळ्यांची पावडर तयार करून ठेवू शकतो आणि फेसपॅकमध्ये वापरू शकतो. (This face pack of rose petals is beneficial for the skin)

गुलाब पाकळ्या आणि मध फेसपॅक – हा पॅक आपल्या त्वचेला खोलवर पोषण देतो. हे त्वचेवरील वृद्धत्व टाळण्यासाठी फायदेशीर आहे. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी 1 चमचे गुलाब पावडर आणि 1 चमचे मध आवश्यक आहे. हे दोन्ही चांगले मिक्स करून याची चांगली पेस्ट तयार करा. 10 ते 15 मिनिटांसाठी ते चेहऱ्यावर लावा आणि नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

गुलाब पाकळ्यांची पावडर आणि नारळ तेल – हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी 2 चमचे नारळ तेल, 5 चमचे गुलाब पाकळ्यांची पावडर, 1 चमचे लव्हेंडर तेल आणि 1 चमचे दही लागेल. हे सर्व घटक मिक्स करून चांगली पेस्ट बनवा. डोळे सोडून बाकी सर्व चेहऱ्यावर ही पेस्ट लावा. सुमारे 15-20 मिनिटांसाठी हा पॅक चेहऱ्यावर तसाच सोडा. यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचेचा टोन सुधारण्यास मदत होते.

गुलाब पाकळ्या आणि दूध – आपण गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर आणि दूधाचा फेसपॅक तयार करू शकतो. हा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला 2 चमचे गुलाब पाकळ्याची पावडर, अर्धा चमचे पाणी, 2 चमचे दूध आणि 2 चमचे एरंडेल तेल आवश्यक आहे. यासाठी प्रथम एक वाटी घ्या आणि त्यात सर्व साहित्य एक-एक करून टाका. या सर्व घटकांचे मिश्रण तयार करा. याची पेस्ट तयार करून संपूर्ण चेहऱ्याला लावा आणि साधारण वीस मिनिटांनंतर आपला चेहरा पाण्याने धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(This face pack of rose petals is beneficial for the skin)