Homemade Face Pack: चमकदार त्वचा मिळविण्यासाठी ‘हे’ घरगुती फेसपॅक वापरा, वाचा अधिक! 

हंगाम कोणतेही असो त्वचेची आणि केसांची काळजी ही घ्यावी लागते. त्वचेची आणि केसांची काळजी घेण्याच्या बाबतीत असे अनेक घरगुती उपाय आहेत. जे सर्वोत्तम आणि सर्वात प्रभावी आहेत. सनटॅन, मुरुम, कोरडी त्वचा किंवा तेलकट त्वचा यावर उपचार करण्यासाठी आपण नेहमी घरगुती उपाय केले पाहिजेत.

Homemade Face Pack: चमकदार त्वचा मिळविण्यासाठी 'हे' घरगुती फेसपॅक वापरा, वाचा अधिक! 
त्वचेची काळजी

मुंबई : हंगाम कोणतेही असो त्वचेची आणि केसांची काळजी ही घ्यावी लागते. त्वचेची आणि केसांची काळजी घेण्याच्या बाबतीत असे अनेक घरगुती उपाय आहेत. जे सर्वोत्तम आणि सर्वात प्रभावी आहेत. सनटॅन, मुरुम, कोरडी त्वचा किंवा तेलकट त्वचा यावर उपचार करण्यासाठी आपण नेहमी घरगुती उपाय केले पाहिजेत. घरगुती फेसपॅक वापरणे तुमच्या सौंदर्याच्या सर्व समस्या दूर करण्यास मदत करते. निरोगी त्वचेसाठी तुम्ही कोणते नैसर्गिक घरगुती फेसपॅक वापरू शकता ते जाणून घेऊया.

चमकदार त्वचेसाठी घरगुती फेसपॅक

-मध आणि दही घ्या आणि त्यात काही चमचे रेड वाईन मिक्स करा. चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटे राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. ते त्वचेला मॉइश्चरायझ करते. टॅन काढून टाकते आणि त्वचा चमकदार बनवते.

-काकडी आणि पपईचा लगदा घ्या आणि दही आणि दोन चमचे ओट्समध्ये मिसळा. आता ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. अर्ध्या तासानंतर ते धुवा. हे टॅन काढून टाकण्यास आणि त्वचा चमकदार बनविण्यात मदत करते.

-तेलकट त्वचेसाठी एक चमचा मूग डाळ पाण्यात काही तास भिजत ठेवा. त्याची पेस्ट बनवा आणि त्यात एक चमचा टोमॅटोचा लगदा घाला. हलके मसाज करत चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटांनंतर पाण्याने स्वच्छ धुवा. त्यामुळे तेलकटपणा कमी होतो आणि त्वचेवर चमक येते.

-अंड्याचा पांढरा भाग, लिंबाचा रस आणि मध मिसळा आणि मास्क म्हणून लावा. 20 मिनिटांनंतर स्वच्छ धुवा. यामुळे त्वचा स्वच्छ होते आणि तेलकटपणा कमी होतो. मध हे नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते.

-दोन चमचे गव्हाचा कोंडा, एक चमचा बदाम, मध, दही आणि अंडे गुलाबपाणी घ्या. ते एकत्र मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. ते ओठांवर आणि डोळ्याभोवती लावणे टाळा. 30 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर धुवा.

-किसलेले सफरचंद पिकलेल्या पपईचा लगदा आणि मॅश केलेल्या केळीमध्ये मिसळा. मिश्रणात दही किंवा लिंबाचा रस मिक्स करा. चेहऱ्यावर लावा आणि 30 मिनिटांनी साध्या पाण्याने धुवा.

-मूठभर गुलाबाच्या पाकळ्या घ्या. धुवून बारीक करून पेस्ट बनवा. एक चमचे दही आणि मध, तसेच 2 चमचे वाळलेल्या आणि किसलेल्या संत्र्याची साल मिसळा. ओठांवर आणि डोळ्याभोवती लावणे टाळा. 20 मिनिटांनंतर साध्या पाण्याने धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

(This homemade face pack is beneficial for getting glowing and healthy skin)

Published On - 10:34 am, Mon, 8 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI