Homemade Scrubs : सन टॅनची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती स्क्रब अत्यंत फायदेशीर!

| Updated on: Mar 16, 2022 | 6:28 AM

जास्त सूर्यप्रकाशामुळे त्वचा टॅन (Tan) होते. हानिकारक अतिनील किरणांमुळे त्वचेचे मोठे नुकसान होते. यामुळे तुमच्या त्वचेतील मेलेनिन वाढते. त्यामुळे त्वचेचा रंग गडद होतो. जास्त वेळ उन्हात राहिल्याने त्वचेवर टॅनिंग सोबतच सुरकुत्या (Wrinkles) देखील होतात. ते काढणे खूप कठीण आहे.

Homemade Scrubs : सन टॅनची समस्या दूर करण्यासाठी हे घरगुती स्क्रब अत्यंत फायदेशीर!
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये त्वचेची अशाप्रकारे घ्या काळजी.
Follow us on

मुंबई : जास्त सूर्यप्रकाशामुळे त्वचा टॅन (Tan) होते. हानिकारक अतिनील किरणांमुळे त्वचेचे मोठे नुकसान होते. यामुळे तुमच्या त्वचेतील मेलेनिन वाढते. त्यामुळे त्वचेचा रंग गडद होतो. जास्त वेळ उन्हात राहिल्याने त्वचेवर टॅनिंग सोबतच सुरकुत्या (Wrinkles) देखील होतात. ते काढणे खूप कठीण आहे. अनेकजण यासाठी केमिकलयुक्त पदार्थांचाही वापर करतात. ते दीर्घकाळापर्यंत त्वचेचे (Skin) खूप नुकसान करतात. अशा परिस्थितीत तुम्ही अनेक प्रकारचे घरगुती उपाय देखील करून पाहू शकता. त्यामुळे टॅनिंग दूर होण्यास मदत होते.

तांदळाच्या पिठ

यासाठी एक ते दोन चमचे तांदळाचे पीठ घ्या. त्यात थोडा मध घाला. एकत्र मिसळून पेस्ट बनवा. चेहरा आणि मानेवर लावा. शरीराच्या उर्वरित भागावर ते लावा. काही वेळ गोलाकार हालचालीत मसाज करा. 10 ते 12 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर त्वचेला पाण्याने धुवा.

ओट्स स्क्रब

ओट्स पावडर बनवण्यासाठी ग्राइंडरमध्ये 2-3 चमचे कच्चे ओट्स टाका. त्यात 3 चमचे दही घालून मिक्स करा. हे मिश्रण चेहरा, मान आणि शरीराच्या इतर प्रभावित भागांवर लावा. काही मिनिटे बोटांनी हळूवारपणे मसाज करा. 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर त्वचेला पाण्याने धुवा. टॅन काढण्यासाठी तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे घरगुती स्क्रब वापरू शकता.

स्ट्रॉबेरी स्क्रब

यासाठी 4-5 ताज्या स्ट्रॉबेरी घ्या. स्ट्रॉबेरीची पेस्ट मिळेपर्यंत ते मिसळा. स्ट्रॉबेरी पल्पमध्ये 1-2 चमचे दूध घाला. हे मिश्रण चेहरा आणि मान तसेच शरीराच्या इतर प्रभावित भागांवर लावा. 2 मिनिटे मसाज करा. 5 ते 6 मिनिटे त्वचेवर राहू द्या. त्यानंतर ते धुवा.

दही स्क्रब

यासाठी तुम्हाला एक चमचा दही आणि अर्धा चमचा मध लागेल. हे मिश्रण चेहरा आणि मान तसेच शरीराच्या इतर प्रभावित भागांवर लावा. काही मिनिटे मसाज करा. 15 ते 20 मिनिटे त्वचेवर राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. हा स्क्रब तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संंबंधित बातम्या : 

Pregnancy Diet : गरोदर आहात, सिजर टाळायचे आहे? मग ‘या’ फळांचा आहारात समावेश नक्की करा!

Health Care : मक्याच्या पिठाचे आरोग्याशी संबंधित फायदे तुम्हाला माहित आहेत? जाणून घ्या हेल्दी माहिती!