AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care : मक्याच्या पिठाचे आरोग्याशी संबंधित फायदे तुम्हाला माहित आहेत? जाणून घ्या हेल्दी माहिती!

कॉर्न फ्लोअर (Corn flour) म्हणजेच मक्याचे पीठ हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उत्तर भारतात, हिवाळ्यात कॉर्न फ्लोअर आणि सरसों का साग यापासून बनवलेल्या रोट्या अतिशय आवडीने खाल्ल्या जातात. असे म्हटले जाते की हे मिश्रण केवळ चवदारच नाही तर शरीरासाठी देखील खूप फायदेशीर (Beneficial) आहे.

Health Care : मक्याच्या पिठाचे आरोग्याशी संबंधित फायदे तुम्हाला माहित आहेत? जाणून घ्या हेल्दी माहिती!
मक्याचे पीठ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीरImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 14, 2022 | 10:35 AM
Share

मुंबई : कॉर्न फ्लोअर (Corn flour) म्हणजेच मक्याचे पीठ हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उत्तर भारतात, हिवाळ्यात कॉर्न फ्लोअर आणि सरसों का साग यापासून बनवलेल्या रोट्या अतिशय आवडीने खाल्ल्या जातात. असे म्हटले जाते की हे मिश्रण केवळ चवदारच नाही तर शरीरासाठी देखील खूप फायदेशीर (Beneficial) आहे. मक्याच्या पिठात व्हिटॅमिन सी (Vitamin C) व्यतिरिक्त ए, के आणि बी कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. एवढेच नाही तर मक्याच्या पिठात लोह, फॉस्फरस, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्सही भरपूर असतात. म्हणूनच डॉक्टर आणि तज्ञ देखील त्याचे नियमित सेवन करण्याचा सल्ला देतात. चला तर जाणून घेऊयात मक्याचे पीठ आहारात समाविष्ट करण्याचे फायदे.

बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते

ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, त्यांनी मक्याच्या पिठापासून बनवलेल्या पदार्थांचे योग्य प्रमाणात सेवन करावे. पोटाच्या समस्यांचे मुख्य कारण म्हणजे पचनसंस्थेची कमकुवतता मानली जाते. मक्याच्या पिठात फायबर असते. बद्धकोष्ठतेची समस्या मक्याच्या पिठामुळे काही दिवसात दूर होईल आणि तुम्हाला आरामही वाटेल.

उच्च कॅलरी

अनेक वेळा लोकांना जास्त भूक लागते आणि ते कधीही काहीही खातात. असे वारंवार होत असेल तर वजन वाढू लागते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी मक्याच्या पिठाची मदत घ्यावी, कारण त्यात कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते. जर तुम्ही मक्याच्या पिठापासून बनवलेल्या गोष्टी खाल्ल्या तर तुम्हाला दिवसभर पोट भरल्यासारखे वाटेल.

कोलेस्ट्रॉल कमी करा

असे म्हटले जाते की मक्याच्या पिठाच्या मदतीने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी केली जाऊ शकते. इतकंच नाही तर मक्याच्या पिठामुळे शरीरातील अतिरिक्त चरबीही बर्न केली जाते. कोलेस्टेरॉल कमी करणारे मक्याचे पीठ आपल्याला हृदयविकारांपासून वाचवते.

या प्रकारे सेवन करा

तुम्हाला हवे असल्यास मक्याचे पीठ दुधात शिजवून देखील खाऊ शकता. यासाठी एक पॅन घ्या आणि त्यात तुमच्या गरजेनुसार मक्याचे पीठ आणि दूध घाला. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मक्याच्या पिठाच्या मदतीने पास्ताही करून पाहू शकता. त्याची चव खूप चविष्ट असेल आणि मुलांनाही खूप आवडेल.

संबंधित बातम्या : 

Health care : किडनी स्टोनच्या त्रासाने त्रस्त आहात, जाणून घ्या ‘या’ काळात कोणती फळे खावीत आणि कोणती टाळावीत!

तुमच्या डोळ्याच्या खालीही डार्क सर्कल आहेत?, ‘हे’ घरगुती उपाय करा आणि डार्क सर्कल दूर पळवा!

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.