चुटकीत उपाय… केस कोरडे होतात?; मग फॉलो करा या टिप्स

थंडीच्या दिवसात गरम पाण्याने केस धुतल्यास तसेच अनेक कारणांमुळे केस कोरडे होऊ लागतात. ज्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या दिसण्यावरही दिसून येतो. अशावेळी केस मऊ आणि चमकदार करण्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.

चुटकीत उपाय... केस कोरडे होतात?; मग फॉलो करा या टिप्स
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 5:05 PM

हिवाळा सुरू होताच खोकला, सर्दी आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्या वाढू लागतात. आता त्यांना सामोरे जाण्यासाठी अनेक प्रकारचे घरगुती उपाय करत असतो. पण बदलत्या हवामानाचा परिणाम हा तुमच्या केसांवरही होत असतो. यामुळे केस कोरडे पडणेआणि केस गळण्याच्या समस्या निर्माण होतात.

हिवाळा सुरु झाला कि थंड वारे वाहू लागतात त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्या त्वचेसोबतच केसांची देखील देखभाल करणे मह्त्वाचे आहे. हिवाळ्यात वातावरणात थंडावा असल्याने केसांमध्ये कोंड्याची समस्या उद्भवते आणि केस कोरडे होतात. त्यामुळे या वेळी केसांची अतिरिक्त काळजी घेण्याची गरज असते, त्यामुळे तुम्हाला या टिप्सच्या मदतीने तुमचे केस कोरडे आणि रुक्ष होण्यापासून वाचवू शकता.

इलेक्ट्रॉनिक उपकरणे टाळावीत

बरेचदा केसांना स्टायलिंग करण्यासाठी आपण हेअर ड्रायर, ब्लोअर, स्ट्रेटनर अशी उपकरणे वापरतो. पण थंडीच्या दिवसात या उपकरणांचा केसांवर विपरीत परीणाम होण्याची शक्यता असते. कारण यामुळे केसांच्या मुळाशी असलेले तेल शोषून घेतात व केस कोरडे होतात. त्यामुळे शक्यतो फार आवश्यकता नसल्यास अशी उपकरणे टाळलेली केव्हाही जास्त चांगली.

केस जास्त धुवू नका

हिवाळाच्या दिवसात रोज केस धुणे टाळावे. तुम्ही जर रोज केस धुवाल तर केसांमधून नैसर्गिक तेल कमी होऊन जाते, ज्यामुळे केस कोरडे आणि रुक्ष होऊ लागतात. आठवड्यातून दोनपेक्षा जास्त वेळा केस न धुण्याचा प्रयत्न करा. हिवाळ्यात केस धुताना मिड शॅम्पूचा वापर करा.

मोठ्या दातांचा कंगवा वापरा

थंडीच्या दिवसात तुमचे केस कोरडे होऊन अधिकच गुंतागुंतीचे झाले असतील तर तुम्ही मोठ्या दाताच्या कंगव्याचा वापर करा. कारण नॉर्मल किंवा पातळ कंगव्याने केसांची गुंता सोडवताना केस जास्त प्रमाणात तुटण्याची शक्यता असते.

हेअर मास्कचा वापर करा

हिवाळ्यात केस मऊ आणि चमकदार करण्यासाठी नियमित हेअर मास्कचा वापर करा. तुम्ही तुमच्या आवडीचा बाजारात सहज उपलब्ध असलेला हेअर मास्क केसांवर लावू शकता . याशिवाय तुम्ही घरी काही नैसर्गिक गोष्टींपासून हेअर मास्क बनवून तो देखील केसांवर लावू शकता, जसे की, आपण कच्चे दूध आणि मध एकत्र करून केसांवर लावू शकता. तुम्ही केळीच्या हेअर मास्क बनवू शकता. अंडी तुम्ही केसांना लावू शकता. या नैसर्गिक गोष्टी केसांना पोषण देण्यासाठी आणि मऊ बनवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

तेलाने मसाज करा

हिवाळ्यात केस कोरडे पडू नये म्हणून आठवड्यातून २ वेळा केसांना तेलाने मसाज करा. त्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचे खोबरेल तेल, जोजोबा ऑईल, बदाम तेल, आवळा तेल असे कोणतेही तेल वापरु शकता. हे तेल थोडे कोमट करुन मग त्याने मसाज करावा. आवश्यकता वाटल्यास तुम्ही तेलामध्ये कांद्याचा रस घालू शकता. त्यामुळे केसांना चांगले पोषण मिळण्यास मदत होते.

धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान.
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?.
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या.
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?.
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक.
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे.
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य.
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट.
'हीच आमची इच्छा होती..', बीडच्या पालकमंत्रीपदावर काय म्हणाले सुरेश धस?
'हीच आमची इच्छा होती..', बीडच्या पालकमंत्रीपदावर काय म्हणाले सुरेश धस?.
सैफच्या हल्लेखोराला बेड्या; बघा आरोपीच्या अटकेचा थरार, कसा घेतला शोध?
सैफच्या हल्लेखोराला बेड्या; बघा आरोपीच्या अटकेचा थरार, कसा घेतला शोध?.