5

चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा !

चेहऱ्यावर नको असलेल्या केसांमुळे आपल्या साैदर्यात बाधा येते.

चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा !
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 4:48 PM

मुंबई : चेहऱ्यावर नको असलेल्या केसांमुळे आपल्या साैदर्यात बाधा येते. हे केस काढण्यासाठी महिलांना पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग किंवा वॅक्सिंगची या प्रक्रियांची मदत घेतात. परंतु, कधीकधी कामामुळे पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ देखील मिळत नाही. अशा परिस्थितीत, आपण देखील असे विचार करता की, असा एखादा कोणता मार्ग वापरला तर आपण त्याद्वारे चेहर्‍यांचे अवांछित केस काढून टाकू शकता. आज आम्ही तुम्हाला घरगुती पॅक सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही चेहऱ्यावर नको असलेले केस घरच्या घरी काढू शकतात. (Try home remedies to remove unwanted facial hair)

साहित्य:

-6 मोठे चमचे साखर

-दोन चमचे मध

-दोन चमचे लिंबाचा रस

-3 चमचे पाणी

अगोदर हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्या आणि चेहऱ्यावर टॅल्कम पावडर लावा जेणेकरून त्वचेतून तेल निघेल आणि ही पावडर चांगल्या प्रकारे शोषून घेते. त्यानंतर तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर ज्याठिकाणी नको असलेले केस आहेत. तेथे लावा आणि साधारण 30 मिनिटे तसेच ठेवा त्यानंतर चेहरा चोळून घ्या आणि पाण्याने चेहरा धुवा.

तुमच्या चेहऱ्यावर जास्त स्वरुपात केस असल्यास नियमित या पेस्टचा उपयोग करावा. यासह आपण चेहऱ्यावर तांदळाच्या पिठाचा लेप देखील लावू शकता. तांदळाच्या पिठामुळे त्वचेवरील अनावश्यक केसांची समस्या दूर होण्यास मदत मिळते.

-दोन चमचे गुलाब पाणी

-दोन चमचे नारळाचे तेल

-दोन चमचे बेसन

वाटीमध्ये नारळाचे तेल व बेसन एकत्रित घेऊन पेस्ट तयार करा. यानंतर एक चमचा गुलाब पाणी मिक्स करा. पेस्ट तयार झाल्यानंतर अपर लिप्सवर लावा आणि 30 मिनिटांनंतर हळूवार रगडून ही पेस्ट काढावी. सलग सात दिवस हा उपाय केल्यास तुम्हाला आपल्या त्वचेमध्ये फरक जाणवेल. यानंतर कापसाच्या मदतीने आपण त्वचेवर गुलाब पाणी लावू शकता.

(टीप : सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा)

संबंधित बातम्या :

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Try home remedies to remove unwanted facial hair)

Non Stop LIVE Update
पावसानं बंद असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन हंगाम पुन्हा सुरू
पावसानं बंद असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन हंगाम पुन्हा सुरू
संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं...छत्रपती शिवरायांची खरी वाघनखं कोणती?
संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं...छत्रपती शिवरायांची खरी वाघनखं कोणती?
गृहिणींनो तुमचं गणित बिघडणार? गॅस महागला; 'इतक्या' रुपयांनी झाली वाढ
गृहिणींनो तुमचं गणित बिघडणार? गॅस महागला; 'इतक्या' रुपयांनी झाली वाढ
आमदार लढणार खासदारकी? काय आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती?
आमदार लढणार खासदारकी? काय आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती?
नार्वेकरांच्या दौऱ्यावरुन ठाकरे अन् भाजप आमनेसामने, तर राऊतांचीही टीका
नार्वेकरांच्या दौऱ्यावरुन ठाकरे अन् भाजप आमनेसामने, तर राऊतांचीही टीका
वाघनखे महाराजांनी वापरलेली आहेत की शिवकालीन? काय आहे वाघनखांचा इतिहास?
वाघनखे महाराजांनी वापरलेली आहेत की शिवकालीन? काय आहे वाघनखांचा इतिहास?
आरक्षणावरुन दानवे आणि वडेट्टीवार आमने-सामने, बघा काय केले आरोप?
आरक्षणावरुन दानवे आणि वडेट्टीवार आमने-सामने, बघा काय केले आरोप?
आता तलाठी अन् तहशीलदार सुद्धा कंत्राटी? 'त्या' जाहिरातीवरून नवा वाद
आता तलाठी अन् तहशीलदार सुद्धा कंत्राटी? 'त्या' जाहिरातीवरून नवा वाद
मुंबईत टोल महाग! 'या' 5 ठिकाणी आकारले जाणार अधिकचे पैसे, किती झाली वाढ
मुंबईत टोल महाग! 'या' 5 ठिकाणी आकारले जाणार अधिकचे पैसे, किती झाली वाढ
Aditya L1 बाबत ISRO ने दिली महत्त्वाची माहिती, किती अंतर कापलं?
Aditya L1 बाबत ISRO ने दिली महत्त्वाची माहिती, किती अंतर कापलं?