चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय ट्राय करा !

प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असते की, आपण वेळेआधी वृद्ध होऊ नये. सगळ्यांनाच आपला चेहरा बहरलेला पहायचा असतो.

चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय ट्राय करा !
स्क्रब
Follow us
| Updated on: Apr 03, 2021 | 4:50 PM

मुंबई : प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असते की, आपण वेळेआधी वृद्ध होऊ नये. सगळ्यांनाच आपला चेहरा बहरलेला पहायचा असतो. परंतु, जर आपल्या चेहऱ्यावर अगदी लहान वयातच सुरकुत्या पडल्या, तर कदाचित आपणास सकाळी उठून आरशात आपला चेहरा पाहणे देखील आवडणार नाही. म्हणूनच, आपणही आपल्या त्वचेची विशेष काळजी घेतली पाहिजे. ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या पडणार नाहीत. (Try these home remedies to get rid of facial wrinkles)

ऑलिव्ह ऑईल आणि दही एकत्रित मिक्स करावे आणि हे मिश्रण आपल्या चेहर्‍यावर व मानेवर व्यवस्थित लावावे. हे मिश्रण चेहऱ्यावर किमान 20 मिनिटे राहू द्या. नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा हा उपाय करा. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या सहज कमी होतील. दह्यामध्ये उपस्थित लॅक्टिक आम्ल आणि इतर नैसर्गिक एंजाइम्स आपल्या त्वचेच्या पेशी पूर्णपणे शुद्ध करतात आणि त्यांना नैसर्गिकपणे घट्ट करतात.

चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्याचा चंदन फायदेशीर असते. चंदनाचा लेप चेहऱ्याला  लावल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यास मदत होते. चंदनातील अॅन्टीबॅक्टेरीयल तत्त्व हे चेहऱ्यावर परिणाम करणारे बॅक्टेरीया नष्ट करतात आणि आपला चेहरा उजळवतात.

तांदूळ केवळ स्वादिष्ट अन्न तयार करण्यासाठीच नव्हे, तर त्वचेच्या उपचारांसाठीही वापरले जातात. तांदळाची पेस्ट चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. यासाठी एका भांड्यात एक चमचा तांदळाचे जाडसर पीठ आणि दोन चमचे गुलाब पाणी घेऊन त्याची पेस्ट तयार करुन घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि हातावर स्क्रबप्रमाणे लावा आणि काहीवेळाने धुवून टाका.

लिंबू पाण्याने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावरील मृत पेशी तसेच सर्व प्रकारचे डाग नाहीसे होऊन चेहरा नितळ होतो. यातील अॅसिडने चेहऱ्यावरील ऑईल बॅलेन्स करतो. कोरफडीमुळे चेहऱ्यावरील मॉईश्चर वाढते, चेहरा साफ बनतो. तसेच चेहरा स्मूथ होऊन त्वचा लवचिक बनते. ऑलिव ऑईल आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.

रोज झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑईलचा वापर करून आपण सुरकुत्यापासून मुक्त होऊ शकता. दररोज झोपायच्या आधी आपल्या हातांना देखील ऑलिव्ह ऑईलने मालिश करा. तेल लावून झाल्यावर हातात सूती ग्लोव्ह्ज घाला आणि रात्रभर छान झोप घ्या. सकाळी उठून कोमट पाण्याने आपले हात आणि चेहरा धुवा.

(टीप : वरील लेख हा सामान्य माहितीवर आधारित आहे. उपचारांपूर्वी आपण सौंदर्यतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)

संबंधित बातम्या : 

(Try these home remedies to get rid of facial wrinkles)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.