तेकलट त्वचेमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून नक्की पाहा !

बहुतेक मुलींना तेलकट त्वचेची समस्या असते आणि उन्हाळ्यात त्यांची त्वचा त्यांना खूप त्रास देते.

तेकलट त्वचेमुळे त्रस्त आहात? मग 'हे' घरगुती उपाय करून नक्की पाहा !
तेलकट त्वचा
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 12:10 PM

मुंबई : बहुतेक मुलींना तेलकट त्वचेची समस्या असते आणि उन्हाळ्यात त्यांची त्वचा त्यांना खूप त्रास देते. तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर मुरूम, काळे डाग आणि काळवटपणा येतो. या तेलकट त्वचेपासून दूर होण्यासाठी वेगवेगळे आैषध उपचार देखील घेतले जातात. मात्र, म्हणावे तसे काही फरक दिसून येत नाहीत. मात्र, आज आम्ही तुम्हाला काही खास घरगुती टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तेलकट चेहऱ्याची तुमची समस्या दूर होण्यास मदत होईल. (Try these home remedies to get rid of oily skin)

‘बहुगुणी’ असणाऱ्या कोरफडीचा वापर बऱ्याचश्या सौंदर्यवर्धक उत्पादनांमध्ये देखील केला जातो. अगदी कुठल्याही ऋतूत कोरफडीचा वापर करता येतो. कोरफडाच्या पानांमध्ये ए, बी1, बी2, बी3, बी6, बी12, सी, ई आणि फॉलिक अॅसिड यांसारखी पोषक तत्व आढळतात. आरोग्याच्या दृष्टीने कोरफडाची पाने ही नैसर्गिकरित्या प्रभावशाली आयुर्वेदीक वनस्पती आहे. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर दिवसातून दोनदा चेहऱ्यावर कोरफडीचा गर लावा. यामुळे तेलकट त्वचा होणार नाही.

दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात बरीच जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ज्यातून आपल्याला पोषण मिळते आणि शरीर मजबूत बनण्यात मदत होते. इतकेच नाहीतर दूध आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. ज्यांचा चेहरा तेलकट होते. त्यांनी दररोज सकाळी चेहऱ्यावर दूध लावणे आवश्यक आहे. शक्य असल्यास दूधात हळद मिसळून लावली पाहिजे. जर हे तुम्ही सतत दोन महिने केले तर तुमच्या चेहऱ्यावर ग्लो देखील येईल.

तेलकट त्वचेसाठी ग्रीन टी आणि मुलतानी मातीचा फेस पॅक अत्यंत फायदेशीर आहे. हा फेस पॅक बनवणे खूप सोपे आहे. यासाठी एक चमचा ग्रीन टीमध्ये, एक चमचा मुलतानी माती मिसळून पेस्ट बनवा आणि 15 ते 20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. नंतर चेहरा पाण्याने धुवा. एक मोठा चमचा मुलतानी माती, एक प्रोबायोटिक कॅप्सूल, दोन चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर पेस्ट तयार करण्यासाठी सर्व सामग्री एकत्र करा. पेस्ट तयार झाल्यानंतर चेहरा आणि मानेवर लावा.

20 मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्या. यानंतर मॉइश्चराइझर देखील लावावे. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर थेट चेहऱ्यावर लावण्याची चूक करू नये. बाजारात मिळणारी बरीच उत्पादने वापरल्यानंतरही, जर तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स जात नसतील तर लिंबू आणि मधाची पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा साधारण 15 मिनिटांनंतर हे धुवा. आठवड्यातून दोनदा याचा वापर केल्याने तुमचा चेहरा साफ होईल. निरोगी आणि चमकणारी त्वचेसाठी, एक चमचा लिंबाचा रस आणि 2 चमचे मध मिसळा. मध आपली त्वचा मॉइश्चराइझ करते. लिंबू त्वचेचे डाग आणि चेहरा स्वच्छ करतो.

संबंधित बातम्या : 

(Try these home remedies to get rid of oily skin)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.