Skin Care : हिवाळ्यात मुरुमाची समस्या दूर करण्यासाठी ‘या’ नैसर्गिक घटकांचा वापर करा, वाचा सविस्तर! 

| Updated on: Dec 06, 2021 | 6:22 AM

हिवाळ्यात कोरडी त्वचा, पिंपल्स आणि मुरुमामुळे अनेकांना त्रास होतो. अशा परिस्थितीत त्वचा स्वच्छ आणि मॉइश्चराइज ठेवणे थोडे कठीण होते. त्वचा मुलायम आणि हायड्रेट ठेवण्यासाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. पण त्यांचा प्रभाव फार काळ टिकत नाही. आपण काही नैसर्गिक घटक वापरू शकता.

Skin Care : हिवाळ्यात मुरुमाची समस्या दूर करण्यासाठी या नैसर्गिक घटकांचा वापर करा, वाचा सविस्तर! 
त्वचा
Follow us on

मुंबई : हिवाळ्यात कोरडी त्वचा, पिंपल्स आणि मुरुमामुळे अनेकांना त्रास होतो. अशा परिस्थितीत त्वचा स्वच्छ आणि मॉइश्चराइज ठेवणे थोडे कठीण होते. त्वचा मुलायम आणि हायड्रेट ठेवण्यासाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. पण त्यांचा प्रभाव फार काळ टिकत नाही. आपण काही नैसर्गिक घटक वापरू शकता. कोरफड आणि लॅव्हेंडर वापरून तुम्ही होममेड पॅक बनवू शकता. हे केवळ त्वचा मऊ करण्यास मदत करते असे नाही तर मुरुमांपासून मुक्त होण्यास देखील मदत करते.

कोरफड

ताज्या कोरफडीचा लगदा मॅश करा आणि आपल्या त्वचेवर समान प्रमाणात लावा आणि सुमारे 15 मिनिटे ठेवा. त्यानंतर ते धुवा. त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही त्यात एक चमचा मध टाकू शकता. केळी आणि कोरफड मिक्स करूनही तुम्ही फेस पॅक बनवू शकता. पिकलेल्या केळीमध्ये कोरफड मिसळून घट्ट पेस्ट बनवा. आता हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि काही मिनिटांनी धुवा.

लॅव्हेंडर

एक चमचा मधात लॅव्हेंडर तेलाचे काही थेंब मिसळा आणि चेहऱ्याला लावा. हा मास्क त्वचेवर सुमारे 15 मिनिटे ठेवा आणि कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्ही एक चमचे खोबरेल तेलात लॅव्हेंडर तेलाचे काही थेंबही मिसळू शकता. नंतर त्वचा स्वच्छ करण्यासाठी कापसाचा गोळा वापरा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

टी ट्री ऑइल

एक चमचा खोबरेल तेलात टी ट्री ऑइलचे काही थेंब मिसळा आणि चेहऱ्याला लावा. तुम्ही त्यात एक चमचा कोल्ड प्रेस केलेले बदाम तेल मिसळून फेस मास्क म्हणून वापरू शकता. तुम्हाला फक्त हे मिश्रण त्वचेवर समान रीतीने लावायचे आहे आणि सुमारे पंधरा मिनिटे तसेच राहू द्या. मग ते स्वच्छ करण्यासाठी कापसाचा गोळा वापरा. शेवटी कोमट पाण्याने चेहरा धुवा.

टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..