Skin Care : चेहऱ्यावरील मुरुमाची समस्या दूर करण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूल अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या अधिक!

त्वचेवर मुरूम येणे ही एक सामान्य समस्या आहे. मुरुमापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही विविध घरगुती उपाय करून पाहू शकता. चेहऱ्यावरील मुरूम कमी करण्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन ई देखील वापरू शकता. हे आपल्या त्वचेसाठी खूप चांगले काम करते.

Skin Care : चेहऱ्यावरील मुरुमाची समस्या दूर करण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूल अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या अधिक!
सुंदर त्वचा


मुंबई : त्वचेवर मुरूम येणे ही एक सामान्य समस्या आहे. मुरुमापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही विविध घरगुती उपाय करून पाहू शकता. चेहऱ्यावरील मुरूम कमी करण्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन ई देखील वापरू शकता. हे आपल्या त्वचेसाठी खूप चांगले काम करते. व्हिटॅमिन ई आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे कोरड्या आणि निस्तेज त्वचेवर उपचार करते. चला जाणून घेऊया त्वचेसाठी व्हिटॅमिन ई ऑईल कसे वापरावे.

टी ट्री ऑईल आणि व्हिटॅमिन ई ऑईल

चार ते पाच व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधील ऑईल काढा आणि एका कंटेनरमध्ये ठेवा. त्यात टी ट्री ऑईलचे काही थेंब घाला आणि ते एकत्र मिसळा. हे चेहऱ्यावर लावा आणि तुमच्या बोटांनी हलक्या हाताने मसाज करा. 15-20 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. मुरुमांपासून लवकर सुटका करण्यासाठी दररोज एकदा हे करा.

कोरफड आणि व्हिटॅमिन ई ऑईल

4-5 व्हिटॅमिन ई कॅप्सूल घ्या आणि त्यांना सेफ्टी पिनने पॉप करा. तेल काढून टाका आणि एका भांड्यात ठेवा. एक चमचा कोरफड जेल व्हिटॅमिन ई ऑईलमध्ये मिक्स करा. हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावा. 20-30 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर साध्या पाण्याने धुवा. हा उपाय आपण दररोज देखील करू शकता.

लिंबू, दही आणि व्हिटॅमिन ई ऑईल

व्हिटॅमिन ई कॅप्सूल घ्या. एका भांड्यात ऑईल काढा. त्यात एक चमचा ताजा लिंबाचा रस आणि एक चमचा दही घाला. एकत्र मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. काही मिनिटांसाठी बोटांनी त्वचेला हळूवारपणे मसाज करा आणि 20-30 मिनिटे राहू द्या. चेहरा धुण्यासाठी साधे पाणी वापरा. आपण आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा हे वापरू शकता.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI