या 5 लोकांसाठी नारळपाणी विषापेक्षा कमी नाही, तुम्हीही तिच चूक करत असाल तर आजच बंद करा
नारळपाणी हे सर्वांच्या आरोग्यासाठी किती उपयुक्त असते हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. नारळपाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. पण हेच नारळपाणी अनेकांसाठी विषासारखं काम करू शकतं. त्यासाठी कोणी नारळ पाणी पिणे टाळलं पाहिजे हे जाणून घेऊयात.

who should not drink coconut waterImage Credit source: tv9 marathi
नारळ पाणी हे आपल्या शरीरासाठी किती चांगले असते हे सर्वांनाच माहित आहे. त्याच अनेक पोषक घटक असतात जे शरीरासाठी अमृतासमान मानले जातात. पण तुम्हाला हे माहित आहे की हेच अमृत म्हणजे हेच मारळपाणी काही लोकांसाठी विषासारखे असू शकते. त्यामुळे सर्वांसाठीच नारळपाणी एकसारखेच काम करते असं नाही. नारळपाणी हे काही लोकांनी पिणे टाळले पाहिजे.
ऋतू कोणताही असो पण शरीराला अधिक हायड्रेट करणे आवश्यक असतं. यासाठी आहारात ज्यूस, ताक आणि नारळ पाण्याचं सेवन करावं असं सांगितलं जातं. काही लोकांना नारळ पाणी खूप आवडते आणि ते आरोग्यासाठी देखील खूप चांगलेही असते. त्यात आढळणारे व्हिटॅमिन सी, ई, कॅल्शियम आणि पोटॅशियमचे बरेच आरोग्य फायदे आहेत. तथापि, नारळ पाणी काही लोकांसाठी नुकसान देखील करू शकते. त्यात असलेले पोटॅशियम काही लोकांसाठी नुकसान करू शकते. नारळ पाणी कोणासाठी नुकसान ठरू शकते आणि त्या लोकांनी किती नारळ पाणी पिणे योग्य आहे ते जाणून घेऊया.
नारळ पाणी कोणी पिऊ नये किंवा पिणे टाळावे?
1. मूत्रपिंडाशी संबंधित आजार
ज्या लोकांना किडनीशी संबंधित आजार आहेत त्यांनी नारळ पाणी अजिबात पिऊ नये. नारळ पाण्यात असलेले पोटॅशियममुळे किडनीच्या फिल्टर करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. किडनीच्या आजारामुळे रुग्णांमध्ये पोटॅशियम आणि सोडियमचे प्रमाण आधीच खूप जास्त असते. अशा परिस्थितीत नारळ पाण्यामुळे हायपरक्लेमियाचा धोका वाढतो. यामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि घबराटीची भावना निर्माण होते.
2. मधुमेहाचे रुग्ण
मधुमेह असलेल्या लोकांनीही नारळ पाणी पिऊ नये. नारळ पाण्यात ग्लायसेमिक इंडेक्स आणि कार्बोहायड्रेट्स जास्त असतात आणि त्यामुळे साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो.
3. वृद्ध लोक
वृद्धांनी दररोज नारळ पाणी पिणे टाळावे. त्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते जास्त प्रमाणात प्यायल्याने शरीरात पोटॅशियमचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे हृदयाच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.
4. ऍलर्जीच्या समस्या
ज्या लोकांना ऍलर्जीशी संबंधित समस्या आहेत त्यांनी देखील नारळ पाणी पिणे टाळावे. यामुळे त्वचेवर खाज सुटणे, जळजळ होणे किंवा लालसरपणा येऊ शकतो.
5. उच्च रक्तदाबाची तक्रार
ज्या लोकांना उच्च रक्तदाब आहे आणि ते त्यासाठी औषधे घेतात त्यांनीही नारळ पाणी पिऊ नये. यामुळे रक्तदाबाची समस्या वाढण्याचा धोका वाढतो.
किती प्रमाणात नारळ पाणी पिऊ शकतात ही लोक?
उन्हाळ्यात बहुतेक लोक दररोज नारळ पाणी पितात, परंतु या काही केलेल्या लोकांनी त्यांच्या दैनंदिन आहारात समाविष्ट करणे टाळावे. जर तुम्ही उन्हात बाहेर असाल किंवा तुम्हाला खूप घाम येत असेल तर अर्धा ग्लास नारळ पाणी पिऊ शकता.
शरीरात पोटॅशियम वाढण्याचा परिणाम
उच्च पोटॅशियम पातळीला वैद्यकीय भाषेत हायपरक्लेमिया म्हणतात. ही स्थिती हृदयाच्या कार्य करण्याच्या क्षमतेमध्ये व्यत्यय आणू शकते. यामुळे विशिष्ट वैद्यकीय स्थिती असलेल्या लोकांमध्ये असामान्य हृदयाचे ठोके किंवा गंभीर गुंतागुंत देखील होऊ शकते.
नारळ पाण्याचे फायदे
नारळ पाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत.
नारळ पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी उपयुक्त असते.
नारळ पाणी ऑक्सिडेटिव्ह ताणापासून संरक्षण करण्याचे काम करते.
नारळ पाणी पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते.
नारळ पाणी वजन कमी करण्यास मदत करते.
नारळ पाणी त्वचा निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
नारळाचे पाणी केसांचे आरोग्य राखण्यास मदत करते.
पण वर सांगितलेल्या लोकांनी नारळ पाणी पिणे टाळावे. तसेच नारळ पाणी पिण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
