AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिरा कोणी वापरावा? कोणत्या राशीसाठी लाभदायक, पाहा आश्चर्यकारक फायदे

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे अनिष्ट प्रभाव कमी करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी रत्ने आणि मंत्र सांगितले आहेत. म्हणजेच ग्रहाशी संबंधित रत्न धारण केल्यास त्या ग्रहाचे अशुभ फळ संपते आणि शुभ फलवाढ होते.

हिरा कोणी वापरावा? कोणत्या राशीसाठी लाभदायक, पाहा आश्चर्यकारक फायदे
| Updated on: Nov 18, 2024 | 7:13 PM
Share

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे अनिष्ट प्रभाव कमी करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी रत्ने आणि मंत्र सांगितले आहेत. म्हणजेच ग्रहाशी संबंधित रत्न धारण केल्यास त्या ग्रहाचे अशुभ फळ संपते आणि शुभ फलवाढ होते. यातच आपण शुक्र ग्रहाशी संबंधित मानल्या जाणाऱ्या हिरे रत्नाविषयी बोलणार आहोत. त्याचबरोबर शुक्र हा शारीरिक सुख, वैवाहिक सुख, आनंद, कीर्ती, कला, प्रतिभा, सौंदर्य, रोमान्स, सेक्स आणि फॅशन-डिझायनिंग इत्यादींचा कारक मानला जातो. त्यामुळे हिरे परिधान केल्याने या क्षेत्रांशी संबंधित फायदाही होतो. चला जाणून घेऊया हिरे घालण्याचे नियम आणि फायदे.

‘या’ राशींसाठी हिरा रत्न शुभ

वृषभ, मिथुन, कन्या, तूळ आणि कुंभ आणि लग्न असणाऱ्यांसाठी हिरे रत्न शुभ असते. म्हणजे या राशीचे लोकं हिरा हे रत्न धारण करू शकतात. दुसरीकडे तुमच्या जन्मपत्रिकेत शुक्र ग्रह योगकारक असेल तर तुम्ही हिरा धारण केले तरी चालेल. त्याचबरोबर पत्रिकेत शुक्र ग्रह शुभ, उच्च स्थानी असेल तरीही तुम्ही हिरा धारण करू शकता. दुसरीकडे जर तुम्ही शुक्राच्या महादशाखाली असाल तर देखील आपण हिरे धारण करता येते. अश्यातच कुंडलीत शुक्र ग्रह कमकुवत असेल तर हिरा परिधान करणे टाळावे.

हिरे घालण्याचे फायदे

हिरा परिधान केल्याने व्यक्तिमत्त्व वाढते. तसेच व्यक्तीला सर्व भौतिक सुखे मिळतात. व्यक्ती सुखी व लक्झरी जीवन जगतो. हिऱ्याची रत्ने परिधान केल्याने वैवाहिक जीवन आनंदी राहते. त्याचबरोबर मीडिया, आर्ट, ड्रामा, लक्झरी आयटम, फॅशन डिझायनिंग, फिल्म लाईन यांच्याशी संबंधित असलेल्यांना हिरे घालता येतात. हिरा परिधान केल्याने आयुर्मानही वाढते. तसेच हिरा धारण केल्याने व्यक्तीची कामुक शक्ती बळकट होते.

या पध्दतीने परिधान करा हिरा

सोने-चांदीप्रमाणेच हिरा देखील खूप महाग असतो. यातच सर्वोत्तम हिरा हा रशियातून येतो. ०.५० ते २ कॅरेटपर्यंत हिरे खरेदी करता येतात. त्याचबरोबर पांढऱ्या सोन्याच्या किंवा चांदीच्या धातूच्या अंगठीत हिरा घालावा. तसेच वैदिक शास्त्रानुसार शुक्रवारी हिरे परिधान करावे. हिरा परिधान करण्यापूर्वी दूध, गंगाजल, साखर आणि मधाने शुद्ध करावे. यानंतर हिरा धारण करावे.

Follow Us
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी: मुंडेगाव ते पाडळीपर्यंत वाहनांच्या रांगा
संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
नाशिकमधील खड्डे पाहणीदरम्यान संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...