Health Tips | हिवाळ्याच्या दिवसांत सर्दी-खोकल्याने हैराण? ‘हे’ पदार्थ घेतील तुमच्या आरोग्याची काळजी!

काही लोकांची रोगप्रतिकार शक्ती इतकी कमकुवत असते की, केवळ थोड्याशा हवामान बदलामुळे सर्दी, खोकला आणि ताप यासारख्या समस्या उद्भवू लागतात.

Health Tips | हिवाळ्याच्या दिवसांत सर्दी-खोकल्याने हैराण? ‘हे’ पदार्थ घेतील तुमच्या आरोग्याची काळजी!
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 2:06 PM

मुंबई : काही लोकांची रोगप्रतिकार शक्ती इतकी कमकुवत असते की, केवळ थोड्याशा हवामान बदलामुळे सर्दी, खोकला आणि ताप यासारख्या समस्या उद्भवू लागतात. अशा परिस्थितीत हिवाळ्याचा हंगाम तर त्यांच्यासाठी एखाद्या आपत्तीप्रमाणेच भासतो. असे लोक हिवाळ्यामध्ये दिवसभर गरम कपड्यांनी स्वत:ला झाकून ठेवतात. परंतु, तरीही त्यांचे शरीर गरम होत नाही आणि ते थंडीने थरथर कापतात. तुम्हालाही अशी काही समस्या असल्यास, हिवाळ्यातील काही विशेष खाद्यपदार्थांविषयी जाणून घ्या…जे या हिवाळ्याच्या मोसमात आपली काळजी घेतील तसेच रोग प्रतिकारशक्ती देखील बळकट करतील (Best Immunity booster food during winter season).

  1. आळशी

आळशी शाकाहारी लोकांसाठी अमृतइतकी गुणकारी आहे. फ्लॅक्ससीड अर्थात आळशीमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असतात, जे सहसा माशांमध्ये आढळतात. या व्यतिरिक्त, आळशीच्या बिया फायबर आणि अँटीऑक्सिडेंटचा खजिना आहेत. हिवाळ्याच्या दिवसांत आळशीचे सेवन केल्याने शरीर मजबूत होते आणि मधुमेह, बीपी, सांधेदुखी, हृदयविकार इत्यादी आजारांपासून आराम मिळतो.

  1. खजूर

खजूर मॅग्नेशियम, सेलेनियम, तांबे, मॅंगनीज आणि फायबरचा उत्तम स्रोत मानला जाते. खजुराच्या नियमित सेवनाने पाचन क्रियेत सुधारणा होते. तसेच पोटाच्या विकारांमध्ये आराम मिळतो. खजूर शरीरात त्वरित उर्जा निर्माण करण्याचे काम करते. खजुराच्या सेवनाने लठ्ठपणा कमी होतो. तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

  1. मनुका

जर, शरीर आतून कमकुवत असेल, तर खूप थंडी वाजण्याची समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत मनुका आपल्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. आपण मनुका सहजपणे एका खिशात ठेवू शकता आणि आपल्यासमवेत घेऊन जाऊन, थोड्या-थोड्या वेळाने त्या खाऊ शकता. मनुक्यात लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबर या घटकांचे मुबलक प्रमाण असते. मनुक्याच्या नियमित सेवनाने शारीरिक दुर्बलता, अशक्तपणासारख्या समस्या कमी होतात.

  1. शेंगदाणे

प्रथिने, जीवनसत्त्वे, जस्त, लोहयुक्त शेंगदाण्यांना ‘स्वस्त बदाम’ देखील म्हटले जाते. हिवाळ्यात शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला आतून उबदारपणा मिळतो, तर तोंडाची चवही चांगली राहते.

  1. गुळ

प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात गुळ सहज मिळतो. गूळ अतिशय उष्ण पदार्थ आहे. गुळ खाल्ल्याने शरीराला आतून ऊब तर मिळतेच, पण सर्दी, खोकला, अशक्तपणा, अॅलर्जी दूर करण्यातही गुळ फायदेशीर ठरतो. हिवाळ्यामध्ये त्याचे लाडूही बनवून खाऊ शकतात (Best Immunity booster food during winter season).

  1. अक्रोड

अक्रोड हा पौष्टिक घटकांचा खजिना मानला जातो. यात फायबर, प्रथिने, व्हिटामिन ई, व्हिटामिन बी 6 आणि अँटी-ऑक्सीडेंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. अक्रोड देखील उष्ण प्रकृतीचा आहे. हिवाळ्यात अक्रोडचे नियमित सेवन केल्याने प्रतिकारशक्ती मजबूत होते. तसेच, कोलेस्टेरॉल कमी होत, हृदयरोगाचा धोका देखील कमी होतो आणि मेंदूसंबंधित समस्येंचा धोका कमी होतो.

  1. बीटरूट

जेवणामध्ये कोशिंबीर म्हणून वापरली जाणारे बीटरूट देखील उष्ण पदार्थ आहे. बीट नियमितपणे खाल्ल्याने त्वचा सुधारते. शरीरात रक्ताचा अभाव निर्माण होत नाही. बीटमध्ये व्हिटामिन ए, बी, बी 1, बी 2, बी 6 आणि सी हे घटक आढळतात.

  1. मेथी

थंडीच्या हंगामात बाजारात मेथीची भाजी मोठ्या प्रमाणात मिळते. मेथीच्या पानांची भाजी सहज तयार होते आणि खाण्यासही चविष्ठ लागते. मेथीमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि व्हिटामिन सी असते.

  1. सफरचंद

सफरचंद खाणाऱ्या व्यक्तीला कधीही डॉक्टरकडे जाण्याची गरज भासत नाही, असे म्हटले जाते. सफरचंदांमध्ये अनेक मिनरल्स, पोटॅशियम, फायबर आणि अँटी-ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात आढळतात. दररोज सफरचंद खाण्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. तसेच, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोग सारख्या गंभीर समस्यांना प्रतिबंध होतो.

  1. किवी

किवीला व्हिटामिन सीचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. चवीला आंबट असणारा कीवी आपल्या शरीराला अनेक प्रकारच्या संक्रमणापासून वाचवण्याचे काम करतो. किवीमध्ये फायबरही भरपूर प्रमाणात असल्याने पोटातील विकार दूर करण्यासाठी देखील किवी खूप उपयुक्त आहे.

(टीप : उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Best Immunity booster food during winter season)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.