AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑगस्ट महिन्यात जोडीदारासोबत ‘या’ ठिकाणांना भेट देऊन तुमचा प्रत्येक क्षण बनवा एकदम खास

तुम्ही जर ऑगस्टमध्ये तुमच्या जोडीदारासोबत प्रवास करण्याचा बाहेर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता. येथे तुम्हाला गर्दीपासून दूर निसर्गाच्या सौंदर्यात तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकते.

ऑगस्ट महिन्यात जोडीदारासोबत 'या' ठिकाणांना भेट देऊन तुमचा प्रत्येक क्षण बनवा एकदम खास
Best places to visit in August with partnerImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 26, 2025 | 2:05 PM
Share

आजकालच्या रोजच्या त्याच धकाधकीच्या आयुष्यात आपल्या प्रियजनांसाठी वेळ काढणे थोडे कठीण होत चालले आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. ऑगस्ट महिन्यात आपल्या भारतात काही ठिकाणे खूप सुंदर दिसतात. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत ही ठिकाणे एक्सप्लोर करू शकता. ही ठिकाणे खूप सुंदर आणि गर्दीपासून दूर आहेत. तसेच निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही छान वेळ घालवू शकता.

जेव्हा जेव्हा फिरायला जाण्याचा विचार करतो तेव्हा बहुतेक लोकं हिमाचल आणि उत्तराखंडला जाण्याचा विचार करतात. पण तुम्ही आपल्या भारतात असलेल्या या ठिकाणी देखील जाऊ शकता. येथे तुम्हाला एकमेकांसोबत काही शांत क्षण घालवण्याची संधी मिळेल. चला त्या ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात.

इगतपुरी

इगतपुरी हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात असलेले एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. तुम्ही या ठिकाणाला भेट देण्याचा प्लॅन करू शकता. इगतपुरी हे मुंबईपासून सुमारे 150 किमी अंतरावर आहे. येथे तुम्हाला ट्रेकिंग करण्याची संधी मिळू शकते. इगतपुरीमध्ये त्रिंगलवाडी किल्ला, भातसा नदी खोरे, विल्सन धरण, कळसूबाई शिखर, विहिगाव धबधबा आणि धनगरवाडी धबधबा अशी सुंदर ठिकाणे आहेत जी एक्सप्लोर करू शकता.

चेरापुंजी

मेघालयातील चेरापुंजी हे पाहण्यासारखे एक अतिशय सुंदर ठिकाणं आहे. येथे एक डबल डेकर लिविंग रूट ब्रिज आहे, जो रबराच्या झाडांच्या मुळांपासून बनवला आहे. याशिवाय, नोहकालिकाई धबधबा येथे खूप प्रसिद्ध आहे. मावसमाई गुहा हे येथील एक आकर्षक ठिकाण आहे. याशिवाय, तुम्ही येथे डावकी नदी, इको पार्क, मावसमाई धबधबा, डेंथलेन धबधबा, वाकाबा धबधबा आणि मावदक डिंपेप व्हॅली सारखी ठिकाणे एक्सप्लोर करू शकता.

कोडाईकनाल

तामिळनाडूमध्ये स्थित कोडाईकनाल हे एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. धुक्याने झाकलेले टेकड्या आणि धबधबे हे नयनरम्य दृष्य अगदी सुंदर दिसते. येथे तुम्हाला गर्दीपासून दूर तुमच्या जोडीदारासोबत शांत वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. तुम्ही येथे कोडाईकनाल तलाव, बेरिंगन तलाव, कोकर वॉक, ब्रायंट पार्क आणि पिलर रॉक ही ठिकाणे एक्सप्लोर करू शकता.

कूर्ग

कुर्गला कोडगु म्हणूनही ओळखले जाते. हे कर्नाटकातील एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. तर हे ठिकाण त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. येथे तुम्ही दुबरे एलिफंट कॅम्प, मडिकेरी किल्ला, पुष्पगिरी वन्यजीव अभयारण्य, मंडलपट्टी व्ह्यू पॉइंट, इरुप्पू फॉल्स आणि हरंगी धरणाला भेट देऊ शकता.

अलेप्पी

अलेप्पी हे केरळमधील एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. ते त्याच्या बॅकवॉटर, हाऊसबोट्स आणि समुद्रकिनाऱ्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला हाऊसबोटमध्ये राहायला मिळते. अलेप्पुझा बीच, वेम्बनाड तलाव, कृष्णपुरम पॅलेस आणि मरारी बीच येथे खूप प्रसिद्ध आहेत. येथे तुम्ही चेट्टीकुलंगरा भगवती मंदिर आणि मुल्लाकल राजराजेश्वरी मंदिराला भेट देऊ शकता.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.