AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या चमत्कारीक झाडाला थरथर घाबरतात साप, या दिवसात घराच्या आसपासही फिरकणार नाहीत; फक्त…

Snake Repellent Plant : अनेकदा साप लोकांच्या घराच्या आसपासही पहायला मिळतात. मात्र सापाला घरापासून दूर ठेवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक जुना उपाय सांगणार आहोत.

या चमत्कारीक झाडाला थरथर घाबरतात साप, या दिवसात घराच्या आसपासही फिरकणार नाहीत; फक्त...
snake repellent plantImage Credit source: AI
| Updated on: May 05, 2026 | 3:43 PM
Share

संपूर्ण देशात उन्हाळा वाढला आहे, जमीन गरम झाल्याने साप बाहेर निघतात. साप दिसताच अनेकांची झोप उडते. ज्या ठिकाणी झाडं-झुडपं किंवा रिकामे प्लॉट आसपास असतात, तिथे साप नक्कीच आढळतात. अनेकदा साप लोकांच्या घराच्या आसपासही पहायला मिळतात. मात्र सापाला घरापासून दूर ठेवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक जुना उपाय सांगणार आहोत. सापाला घरापासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही घराच्या आसपास एक झाड लावू शकता, यामुळे घरातील भांडणं आणि तणावही कमी होतो. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आज आपण सर्पगंधा या वनस्पतीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार सर्पगंधा ही एक खास वनस्पती आहे. ती घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. जर तुमच्या घरात छोट्या-छोट्या कारणांवरून वाद होत असतील, मन अस्वस्थ राहत असेल किंवा नकारात्मकता जाणवत असेल, तर सर्पगंधा उपयुक्त ठरू शकते. ही वनस्पती घरातील वातावरण हलकं करते आणि मानसिक शांतता देते. तसेच ही वनस्पती सापांनाही दूर ठेवते.

साप या वनस्पतीपासून दूर राहतात?

गावाखेड्यात सर्पगंधाला सापांचा शत्रूच मानलं जातं. अशी जुनी समजूत आहे की या वनस्पतीच्या मुळांचा आणि पानांचा वास इतका तीव्र असतो की साप तिच्या जवळही येत नाहीत. म्हणूनच पूर्वीचे लोक घराच्या बाहेर किंवा कुंपणाजवळ ही वनस्पती लावत असत. अनेक वर्षांपासून लोक तिला नैसर्गिक सुरक्षा रक्षक म्हणून वापरत आहेत. मात्र ही वनस्पती कोणत्या दिशेला आहे हे देखील खूप महत्ताचे आहे.

योग्य दिशेचं महत्त्व

वास्तुनुसार जर ही वनस्पती चुकीच्या दिशेला लावली, तर तिचा पूर्ण फायदा मिळत नाही. या वनस्पतीसाठी सर्वोत्तम दिशा ही पूर्व किंवा आग्नेय (दक्षिण-पूर्व) ही आहे. या दिशेला ही वनस्पती लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. तसेच अनेक जण ही वनस्पती मुख्य दरवाजाजवळही लावतात, यामुळे घरात येणारी हवा आणि ऊर्जा शुद्ध राहते.

राहू-केतू आणि कालसर्प दोष

ज्योतिषशास्त्रानुसार सर्पगंधाचा संबंध राहू आणि केतू या ग्रहांशी जोडला जातो. यामुळे ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष असतो, त्यांच्यासाठी ही वनस्पती शुभ मानली जाते. घरात सर्पगंधा लावल्याने ग्रहांची अस्थिरता कमी होते आणि व्यक्तीला अंतर्गत शांतता मिळते. याचाच अर्थ सर्पगंधा ही वनस्पती सापांना दूर ठेवण्यासह घरातील वातावरण आणि मानसिक शांतीही सुधारते.

Follow Us
अखेर तेच घडलं! नाशिकमध्ये महायुतीतील नेत्यांमध्ये बिनसलं; नरेंद्र दराड
अखेर तेच घडलं! नाशिकमध्ये महायुतीतील नेत्यांमध्ये बिनसलं; नरेंद्र दराडे म्हणाले, शिंदेच...
नाशिकमध्ये राजकीय भूकंप! अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा मोठा विजय
Nashik Gokul Gite | नाशिकमध्ये राजकीय भूकंप! अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा मोठा विजय, महायुतीला धक्का
अखेर ठरलं! ओमराजे निंबाळकरांचा ठाकरे गटाला रामराम, शिंदे गटात...
tv9 Marathi Special Report | अखेर ठरलं! ओमराजे निंबाळकरांचा ठाकरे गटाला रामराम, शिंदे गटात प्रवेश निश्चित
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात!
Nagpur Vidhan Parishad | विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात!; महायुतीचे वर्चस्व कायम राहणार की उलटफेर होणार?
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!