मुंबईपासून 100 किमीवर आहे स्वर्ग, ‘हे’ हिल स्टेशन वनडे ट्रीपसाठी आहे खास
मुंबईतील गर्दी आणि उष्णतेपासून आराम मिळवायचा असेल तर तमुच्यासाठी खास बातमी आहे. आज आपण मुंबईपासून केवळ 100 किमी अंतरावर असलेल्या एका हिल स्टेशनची माहिती जाणून घेणार आहोत

मुंबई हे वर्दळीचे शहर आहे. तुम्हाला मुंबईतील गर्दी आणि उष्णतेपासून आराम मिळवायचा असेल तर तमुच्यासाठी खास बातमी आहे. आज आपण मुंबईपासून केवळ 100 किमी अंतरावर असलेल्या एका हिल स्टेशनची माहिती जाणून घेणार आहोत, जे वनडे ट्रीपसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. येथील थंड हवामान, हिरवळ आणि शांत वातावरणामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. या ठिकाणाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मुंबईकरांना धावपळीच्या जीवनापासून आराम मिळवायचा असेल तर माथेरान हे हिल स्टेशन खास आहे. पावसाळ्यात येथील निसर्ग तुमचे मन नक्कीच प्रसन्न करेल. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 800 मीटर उंचीवर आहे. तसेच हे ठिकाण मुंबईपासून जवळ असल्याने एका दिवसात परत येणे शक्य आहे. यामुळे माथेरानला वीकेंडला मोठी गर्दी पहायला मिळते.
माथेरानमधील हिरवीगार जंगले, सुंदर दऱ्या, घोडेस्वारी आणि टॉय ट्रेनचा प्रवास या काही आकर्षक गोष्टी आहेत. तुम्हाला निसर्गाच्या जवळ जायचे असेल, पण जास्त प्रवास करायचा नसेल तर माथेरान तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
माथेरानचे वैशिष्ट्ये काय आहेत?
माथेरानमधील हवा पूर्णपणे शुद्ध आहे आणि वातावरण शांत आहे. त्यामुळे शहरातील लोक येथे येऊन मोकळा श्वास घेतात. पावसाळ्यात माथेरानमधील हिरवळ, धबधबे आणि धुक्याने झाकलेले डोंगर स्वर्गसुखाचा अनुभव देतात. त्यामुळे या ठिकाणाला मुंबई आणि पुण्यातील लोक वीकेंडला भेट देतात.
माथेरानमध्ये तुम्हाला इको पॉइंट, लुईसा पॉइंट, शार्लोट लेक, हनिमून पॉइंट आणि पॅनोरमा पॉइंट असे प्रेक्षणीय स्थळे पहायला मिळतील. येथे तुम्ही घोडेस्वारी किंवा पायी ट्रेकिंगचा आनंद घेऊन वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देऊ शकता. येथील स्ट्रीट फूडचा आनंद घेऊ शकता तसेच बाजारातील हस्तकलेच्या वस्तू खरेदी करू शकता.
माथेरानला कसे पोहोचायचे?
माथेरानची वनडे ट्रीप करायची असल्यास तुम्हाला सकाळी लवकर निघावे लागेल. मुंबई किंवा पुण्याहून तुम्ही लोकल ट्रेन किंवा कारने नेरूळ पोहोचू शकता. त्यानंतर नेरुळवरून माथेराना टॉय ट्रेन किंवा टॅक्सीने जाता येते. जर सकाळी हवामान स्वच्छ असेल तर टॉय ट्रेनने प्रवास करणे फायदेशीर ठरेल. या प्रवासात तुम्हाला संस्मरणीय अनुभव येईल. माथेरानला तुम्हाला एन्ट्री फी भरावी लागेल. त्यानंतर घोडेस्वारी करून किंवा चालत विविध ठिकाणांना भेटी देऊ शकता.
माथेरानमध्ये विविध रेस्टॉरंट आहेत, यात तुम्ही दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. येथे तुम्हाला थाळी, वडा-पाव, मिसळ-पाव हे पदार्थ मिळतात. दिवसभर फिरल्यानंतर तुम्ही संध्याकाळी नेरुळला जाऊन ट्रेन किंवा कारने मुंबई-पुण्याला जाऊ शकता. ही वनडे ट्रीप तुम्ही खूप कमी खर्चात करु शकता. या एका दिवसाच्या ट्रीपने तुमचे मन नक्कीच प्रसन्न होईल.