‘टॅटू’ केल्यावर रक्तदान करता येत नाही? जाणून घ्या, ‘टॅटू’ संर्भातील ही माहिती, कीती दिवसांनी करता येईल रक्तदान!

एकदा टॅटू केल्यावर माणूस कधीही रक्तदान करू शकत नाही अशी माहिती तुम्हालाही मिळाली असेल. पण हे पूर्ण सत्य नाही. टॅटू केल्यानंतर कीती दिवस रक्तदान करता येत नाही, याबाबत तज्ज्ञ काय म्हणतात याबाबत जाणून घेऊया.

‘टॅटू’ केल्यावर रक्तदान करता येत नाही? जाणून घ्या, ‘टॅटू’ संर्भातील ही माहिती, कीती दिवसांनी करता येईल रक्तदान!
टॅटू काढल्यास किती दिवस रक्तदान करता येत नाही?Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 9:25 PM

मुंबई : आजकाल टॅटू काढणे ही एक नवीन फॅशन (New fashion) बनली आहे आणि बरेच लोक शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर टॅटू बनवतात. पण, टॅटूबाबत (About tattoos) असे म्हटले जाते की, ते करून घेण्याचे अनेक तोटे आहेत. या तोट्यात नोकरी न मिळण्याच्या तर्कापासून ते टॅटू काढल्यानंतर व्यक्ती कधीही रक्तदान (Blood donation) करू शकत नाही, अशा अनेक अफवाही पसरविण्यात आल्या आहेत. इंटरनेट आणि सोशल मीडियावरील अनेक रिपोर्ट्समध्ये ही माहिती शेअर केली जाते की, ज्या व्यक्तीने आपल्या शरीराच्या कोणत्याही भागात टॅटू काढला असेल, तर तो आयुष्यभर रक्तदान करू शकत नाही. दरम्यान, या विषयावर डॉक्टरांचे म्हणणे वेगळे आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला टॅटू आणि रक्तदानाबाबत सोशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीत किती तथ्य (Facts) आहे याबाबत सविस्तर माहिती देणार आहोत.

टॅटू आणि तर्क विर्तक

वास्तविक, सोशल मीडियावर टॅटूबद्दल अनेक चुकीची माहिती दिली जाते, पण तुम्हाला माहित आहे का हे तर्क किती खरे आहे आणि यावर डॉक्टरांचे काय म्हणणे आहे? त्याचे सत्य काय आहे? डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, एकदा टॅटू काढल्यानंतर एखादी व्यक्ती कधीही रक्तदान करू शकत नाही, असे नाही. टॅटू काढल्यानंतरही एखादी व्यक्ती सहजपणे रक्तदान करू शकते. पण, नुकतेच एखाद्याने टॅटू काढला असेल तर तो रक्तदान करू शकत नाही, असे या अहवालात सांगण्यात आले आहे. टॅटू बनवल्यानंतर सुमारे 6 महिने कोणतीही व्यक्ती रक्तदान करू शकत नाही आणि त्यानंतर मात्र ती व्यक्ती रक्तदान करू शकते.

बॉडी पियर्सिंगबाबत काय म्हणतात तज्ज्ञ

पियर्सिंगबद्दल असंही म्हटलं जातं की जर एखाद्याने पिअरिंग केलं असेल तर ती व्यक्ती रक्तदान करू शकत नाही. दरम्यान, या अहवालात असेही म्हटले आहे की जर एखाद्याने आरोग्य व्यावसायिकाकडे बॉडी पियर्सिंग केले असेल आणि टॅटू केल्यामुळे आलेली सूज बरी झाली असेल, तर टॅटू केल्यानंतर सुमारे 12 तासांनंतरही रक्तदान केले जाऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला रक्तदान करायचे असेल तर सर्वप्रथम या गोष्टी लक्षात ठेवा.

हे सुद्धा वाचा

तज्ञ काय म्हणतात?

त्याच वेळी, एशियन हॉस्पिटलच्या सहयोगी संचालक (प्रयोगशाळा) डॉ. उमा राणी म्हणतात, ‘जर एखाद्याने टॅटू काढला असेल, तर ते वर्षभर रक्तदान करू शकत नाहीत. टॅटूला एकाधिक छेदन मानले जाते, म्हणून काही दिवस प्रतीक्षा करणे आवश्यक आहे. याशिवाय शरीरावर एखादी छोटीशी शस्त्रक्रिया झाली असेल तर अशा स्थितीत रक्तदानासाठी वाट पाहावी लागते. दिल्लीतील PSRI हॉस्पिटलच्या डॉ. विनिता सिंह टंडन सांगतात, ‘जर एखाद्या व्यक्तीने टॅटू काढला असेल, तर तो 6 महिन्यांपर्यंत रक्तदान करू शकत नाही. वास्तविक, टॅटूमध्ये सुईने खूप छिद्र केले जाते आणि यामुळे बरेच संक्रमण होऊ शकते. अशा स्थितीत त्याला एचआयव्ही, हिपॅटायटीस बी इत्यादी असू शकतात आणि ते संक्रमणक्षम आहेत, यामुळे दुसरया रुग्णातही त्याचे संक्रमण होऊ शकते. यासोबतच ज्यांना ताप, सर्दी इत्यादी आजार आहेत त्यांनीही रक्तदान करणे टाळावे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.