AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दह्यात या 2 गोष्टी मिसळून खा, शरीरात व्हिटॅमिन B12 झपाट्याने वाढेल, औषधाचीही गरज पडणार नाही

दररोज दह्यात दोन खास गोष्टी मिसळून ते खाल्ल्याने नैसर्गिकरित्या B12 ची कमतरता नक्कीच दूर करू शकता. हा एक प्रभावी घरगुती उपाय असून तो शरीरात नैसर्गिक पद्धतीने व्हिटॅमिन B12 वाढवू शकतो.

दह्यात या 2 गोष्टी मिसळून खा, शरीरात व्हिटॅमिन B12 झपाट्याने वाढेल, औषधाचीही गरज पडणार नाही
Yogurt with Sesame Seeds & FenugreekImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 02, 2025 | 3:44 PM
Share

आजकाल अनेक लोकांमध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता दिसून येत आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात थकवा, चक्कर येणे, स्मरणशक्ती कमकुवत होणे आणि वारंवार डोकेदुखी यासारख्या समस्या सामान्य झाल्या आहेत. मग त्यासाठी महागडे सप्लिमेंट्स, औषधे घ्यावी लागतात. पण आपण आपल्या रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश केला तर नक्कीच आपल्या शरीरातील B12 वाढेल आणि कदाचित औषधांचीही गरज पडणार नाही. रोजच्या आहारात समाविष्ट करून घ्यायचा पदार्थ म्हणजे दही. फक्त दहीच नाही तर त्यात 2 गोष्टी मिसळायच्या आणि त्या दह्याचं सेवन करायचं नक्कीच तुम्हाला फरक दिसून येईल.

दररोज दह्यात दोन खास गोष्टी मिसळून ते खाल्ल्याने तुम्ही नैसर्गिकरित्या ही कमतरता दूर करू शकता. चला जाणून घेऊयात एक प्रभावी घरगुती उपाय जो शरीरात नैसर्गिक पद्धतीने व्हिटॅमिन B12 वाढवू शकतो.

दही हे व्हिटॅमिन B12 वाढवण्यासाठी एक नैसर्गिक सुपरफूड

दही स्वतःच एक आरोग्यदायी प्रोबायोटिक आहे जे पचन सुधारते आणि शरीराला थंड करते. त्यात आधीच काही प्रमाणात व्हिटॅमिन B12 असते. परंतु जेव्हा त्यात काही गोष्टी मिसळल्या जातात तेव्हा ते व्हिटॅमिन B12 चे पॉवरहाऊस बनते.

1. भाजलेले तीळ तीळ, विशेषतः पांढरे तीळ, व्हिटॅमिन-बी कॉम्प्लेक्सने समृद्ध असतात. त्यात निरोगी चरबी फॅट्स, खनिजे असतात जी दह्यासोबत मिसळल्यास व्हिटॅमिन B12 अजून वाढते. ते पचन सुधारते आणि शरीराला ऊर्जा देखील देते. एक चमचा भाजलेले तीळ दह्यात मिसळा आणि नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात हे दही घ्या.

2. मेथीचे दाणे मेथीच्या बियांमध्ये लोह, फायबर आणि व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते. ते शरीरात पचन सुधारून पोषक तत्वांचे शोषण करण्यास मदत करते. दह्यासोबत मिसळल्याने ते व्हिटॅमिन B12 ची पातळी वेगाने वाढवते. मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते गाळून घ्या आणि मग दह्यात मिसळा.

याचे फायदे काय?

थकवा आणि अशक्तपणा कमी होतो. स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करणे सुधारणे डोकेदुखी आणि चिडचिडेपणापासून आराम त्वचा आणि केसांचे आरोग्य चांगले राहते मजबूत रोगप्रतिकारक शक्ती

दही खाताना या गोष्टींची काळजी घ्या:

नेहमी ताजे आणि साखर न घालता दही खा. कमीत कमी 21 दिवस नियमितपणे हा उपाय करा जर लक्षणे गंभीर असतील तर घरगुती उपयांसाबोत डॉक्टरांचा सल्लाही आवर्जून घ्या.

तर अशापद्धतीने व्हिटॅमिन B12ची कमतरता दूर करण्यासाठी भाजलेले तीळ आणि मेथीचे दाणे दह्यात मिसळून खाऊन तुम्ही ही कमतरता नैसर्गिकरित्या दूर करू शकता. ही पद्धत केवळ सोपीच नाही तर चविष्ट देखील आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.