सावधान! मेंदूत जळजळ झाल्यास गंभीर; कोरोनाचं समोर आलं धक्कादायक लक्षणं

सावधान! मेंदूत जळजळ झाल्यास गंभीर; कोरोनाचं समोर आलं धक्कादायक लक्षणं

कोरोनाची लागण झाल्यामुळे मेंदूत जळजळ होण्यास सुरुवात झाली तर त्याने स्मरणशक्ती हरवू शकते. यामुळे तज्ज्ञांनी यासंबंधी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Oct 18, 2020 | 6:24 AM

मुंबई : राज्यात गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. अशात धोका वाढला तसा कोरोनाच्या लक्षणांमध्येही बदल होत गेले. आताही कोरोनाची अशीच धक्कादायक लक्षणं समोर आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झाल्यामुळे मेंदूत जळजळ होण्यास सुरुवात झाली तर त्याने स्मरणशक्ती हरवू शकते. यामुळे तज्ज्ञांनी यासंबंधी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. (brain inflammation can cause loss of memory due to corona infection)

मिरा रोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात एक अशी घटना समोर आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या मेंदूत जळजळ झाली आणि तिने स्मरणशक्ती हरवली. रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. पण जर असा कोणताही त्रास तुम्हाला जाणवला तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार करा, अन्यथा हे जीवावर बेतू शकतं.

पालघर जिल्ह्यात राहणाऱ्या 47 वर्षीय शाइस्ता पठाण कोरोना पॉझिटिव्ह महिलेला दुर्मिळ असा एन्सेफलायटीस म्हणजे (मेंदूत जळजळ) होणं ही समस्या दिसून आली होती. विशेषतः कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांमध्ये श्वसनासंबंधित विकार पाहायला मिळतात. परंतु, मागील काही काळात कोरोना रूग्णांमध्ये गुलियन-बॅरी सिंड्रोम किंवा स्ट्रोक संबंधित विकार झाल्याचं निदर्शनास आलं आहे. या महिलेला कोरोना असल्याने मेंदूत जळजळ होत होती.

अशा गंभीर परिस्थितीत मीरारोड इथल्या वोक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून या महिलेचे प्राण वाचवले. कोरोनाचा लागण झाली असल्याने महिलेची स्मरणशक्ती हरवली होती डॉक्टरांनी दिली आहे. (brain inflammation can cause loss of memory due to corona infection)

मीरारोड इथल्या वोक्हार्ट रूग्णालयातील न्युरोलॉजिस्ट डॉ. पवन पै यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या टीमने शाइस्तावर यशस्वी उपचार केले आहेत. मागील काही दिवसांपासून शाइस्ता यांना पोटदुखी आणि डोकेदुखीचा त्रास जाणवतं होता. 13 ऑगस्ट रोजी स्थानिक डॉक्टरांकडून औषधोपचार करण्यात आले पण प्रकृती अधिकच खालावू लागल्याने कुटुंबियांनी त्यांना रूग्णालयात दाखल केलं. यापूर्वी त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता. मात्र, घरात कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने तिच्यावर दुसऱ्या रूग्णालयात उपचार सुरू होते. या महिलेच्या पोटाचा, छातीचा व मेंदूचा सीटीस्कॅन करण्यात आला. या महिलेची अँण्टीजन चाचणी निगेटिव्ह आली होती. रक्ताचा अहवालही सामान्य होता.

यानंतर 15 ऑगस्ट रोजी मेंदूच्या एमआरआय रिपोर्टमध्ये रक्तस्त्राव होत असल्याचे निदान झाले. त्यांच्या मानेला ताठरपणा आला होता. अशा स्थितीत कोविड-19 चाचणी केली असता ती पॉझिटीव्ह आली. याशिवाय या आजारासह त्यांना एन्सेफलायटीस हा व्हायरसची लागण झाल्याचंही निष्पण्ण झालं. त्यानंतर त्यांना तातडीने आयसीयूमध्ये हलवण्यात आलं आणि उपचार सुरू करण्यात आले.

इतर बातम्या – 

भारतात कोरोना लस कधी येणार? जगातील सर्वात मोठ्या कोरोना लस उत्पादन कंपनीकडून माहिती

Corona Vaccine | नागरिकांपर्यंत वेगाने कोरोना लस पोहचवण्यासाठी व्यवस्था करा : पंतप्रधान मोदी

(brain inflammation can cause loss of memory due to corona infection)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें