AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

योगा करताना कोणते कपडे घालावे? जाणून घ्या

योगा करणे आरोग्याच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे बनले आहे. कारण, आपली रोजची चाललेली धावपळ तुम्हाला काही वेगळ सांगायला नको. ग्रामीण भागापासून ते शहरी भागात अनेक जण नियमित रोज योगा करत असतात. आता प्रश्न हा आहे की, योगा करताना कोणते कपडे घालावे, हे अनेकांना माहिती नसते. याविषयी जाणून घेऊया.

योगा करताना कोणते कपडे घालावे? जाणून घ्या
योगा करताना कोणते कपडे घालावे?
| Edited By: | Updated on: Jun 20, 2025 | 7:37 PM
Share

योगा हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे रोज योगा करण्याचा आग्रह धरला जातो. मन आणि शरीर यांचा अभ्यास आहे. विविध प्रकारच्या शारीरिक मुद्रा, श्वास घेण्याच्या पद्धती, ध्यान आणि विश्रांती घेणे या सर्वांचे एकत्रीकरण म्हणजे योगा. पण, आज आम्ही तुम्हाला याच योगाविषयीची एक खास गोष्ट सांगणार आहोत.

महिलांचे व्यायामासाठी तयार करण्यात आलेले कपडे हे फक्त आकर्षक दिसण्यासाठी नसतात, तर ते घातल्यानंतर शरीरासाठी आरामदायक वाटणं, यासाठी ते बनवले जातात. यामुळे व्यायाम करणे देखील सोपे जाते.

तुम्हाला योगा करताना हालचाल करणे आणि श्वास घेणे सोपे जावे, यासाठी खास योगासाठी तयार करण्यात आलेले कपडे तुम्ही घेऊ शकता. मॅट किंवा जमिनीवर योगा करताना परिधान हे कपडे तुम्ही घालू सकता. याचविषयीची माहिती आज आम्ही तुम्हाला अगदी विस्ताराने देणार आहोत.

पायात मोजे घालण्याचे काय फायदे?

खास पद्धतीने तयार करण्यात आलेल्या या मोज्यांचे तळवे विशिष्ट प्रकारच्या ग्रीपने बनलेले असतात. यामुळे तुमचे पाय सरकत नाहीत. तोल कायम राखण्यासाठी आणि स्थिरता आणण्यासाठी देखील हे मोजे उपयुक्त ठरतात. मोज्यांमुळे तुमचे पाय सरकत नाहीत. कापसाच्या बांबू या प्रकारापासून हे मोजे तयार करण्यात येतात. मोज्यांमुळे आतील भागात हवा खेळती राहून जिवाणूंच्या वाढीला प्रतिबंध होतो. या मोज्यांच्या वापराने दुर्गंधीचा त्रास होत नाही. त्यामुळे वजनाने हलके असणाऱ्या या मोज्यांचा वापर करुन विविध प्रकारचे व्यायाम तुम्ही करु शकता.

योगा करताना महिलांनी कोणते कपडे घालावे?

मोकळेपणा आणणारा टॉप घालून तुम्ही अगदी आरामात योग अभ्यास करु शकता. महिलांसाठी व्यायाम करताना घालायच्या टॉपची रचना ही एखाद्या कुर्त्या प्रमाणे करण्यात आलेली आहे. टॉपची शिवण घट्ट करण्यात आलेली असावी.

योगा करताना कोणती पँट घालावी?

मागच्या बाजूने थोड्या पातळ असणाऱ्या या योगा पँट तुमच्या कपाटात असायलाच हव्या. या पँटचे कापड लवचिक असल्यामुळे तुम्ही हवे असलेले कर्व्ह हायलाईट करु शकता किंवा नको असलेले रोल लपवू शकता. काही अशाप्रकारचे व्यायाम असतात ज्यामध्ये तुमच्या लवचिकतेचा कस लागतो अशावेळी ही पॅन्ट वापरणे योग्य आहे.

योगाचा सेट

योगा सेट वजनाने अतिशय हलका असावा. सेट हा अपारदर्शक 4 way stretch प्रकारच्या कापडापासून बनलेला असावा. व्यायाम करताना वाकणे, बैठक मारणे, वजन उचलणे आणि धावणे यांसारख्या क्रिया करणे सोपे जावे. याचे moisture-wicking कापड तुम्हाला कोरडे ठेवते आणि तुमच्या शरीराचे योग्य तापमान राखण्यास मदत होते. Anti-odor तंत्रज्ञान जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करते आणि दुर्गंधीचा त्रास होत नाही.

योगा किंवा हलका व्यायाम करताना four-way stretch lycra spandex प्रकारच्या कापडापासून बनलेल्या ब्रा वापरा. या अतिशय लवचिक असतात. अशा प्रकारच्या स्पोर्ट्स ब्रा मध्ये कोणत्याही प्रकारची वायर नसते. त्यामुळे तुम्हाला संपू्ण दिवस आरामदायी वाटते.

पॅन्ट कोणती घालावी?

योगा करताना पॅन्टचा स्पर्श त्वचेला अतिशय मऊ वाटतो. या पॅन्ट्सची अनोखी रचना ही एक फॅशन स्टेटमेंट असून यामुळे तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे दिसता. यावर प्रिंट करण्यात आलेले आकार आणि रंग खूप काळासाठी अतिशय ताजेतवाने आणि अनोखे वाटतात.

ट्राऊजर्स

ट्राऊजर्स इतके आरामदायी आहेत की घरी किंवा बाहेर कुठेही तुम्ही याचा वापर करु शकता. टाऊजर्सच्या कंबरेच्या भागात आणि पायांच्या टोकाकडे ईलॅस्टीक असते. ट्राऊजर्स हे बऱ्यापैकी मोठे असतात त्यामुळे चालणे किंवा हालचाल करण्यात कोणतीही अडचण येत नाही.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.