AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात या आजारांवर रामबाण उपाय आहे गाजरचा ज्युस

गाजरचा ज्युस पिण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे हिवाळ्यात त्याचा समावेश केला पाहिजे. गाजरमध्ये असलेले अनेक गुण आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. गाजराचा अनेक प्रकारे तुम्ही आहारात समावेश करु शकतात. जाणून घ्या गाजरचा ज्युस पिण्याचे फायदे.

हिवाळ्यात या आजारांवर रामबाण उपाय आहे गाजरचा ज्युस
carrot
shailesh musale
shailesh musale | Updated on: Dec 07, 2023 | 8:15 PM
Share

benefits of carrot : हिवाळ्यात अनेक आजार डोकं वर काढत असतात. हवामानात बदल होत असताना अनेकांना सर्दी, खोकला तसेच त्वचेशी संबंधित आजार होत असतात. हिवाळ्यात प्रदुषण देखील यामागचं एक कारण असू शकतं. तुम्ही देखील या आजारांपासून बचाव व्हावा म्हणून आहारात विशेष काळजी घेतली पाहिजे.  अनेक प्रकारच्या भाज्या आपल्या आहाराचा भाग असल्या पाहिजेत. त्यापैकीच एक म्हणजे गाजर. हिवाळ्यात आपण आहारात गाजराचा समावेश करावा. पण सोबतच गाजराचा ज्युस देखील घेऊ शकता. गाजरमध्ये बीटा-कॅरोटी, फायबर, व्हिटॅमिन K1, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स सारख्या पोषक तत्व असतात.

वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही गाजराचा आहारात समावेश करु शकता. कोशिंबीर, लोणचे, गाजराचा हलवा करुन तुम्ही खाऊ शकता. गाजर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. जाणून घेऊ त्याचे फायदे

गाजर हृदयासाठी फायदेशीर

गाजराच्या रसमध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते, जे तुमच्या हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. गाजरातील अँटीऑक्सिडंट्स हृदयविकाराचा धोका कमी करू शकतात.

गाजर पचन सुधारते

जर तुम्हाला तुमचे पचन सुधारायचे असेल तर तुमच्यासाठी गाजराचा रस हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये असलेले फायबर पचनक्रिया उत्तम ठेवते. फायबर आतड्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवून बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करू शकते.

गाजर त्वचेसाठी फायदेशीर

गाजराचा रस प्यायल्याने त्वचेचे वृद्धत्व टाळता येते. हे तुमच्या त्वचेला सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवते आणि तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक देते.

गाजर डोळ्यांसाठी फायदेशीर

गाजर हे व्हिटॅमिन ए चा उत्कृष्ट स्त्रोत आहे, जो आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळेच गाजराचा रस पिण्यास स्वादिष्ट तर आहेच, शिवाय त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत.

गाजरमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म

गाजरात बीटा-कॅरोटीनसारखे अँटीऑक्सिडंट असतात, जे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात.

गाजर पोषक तत्वांनी समृद्ध

गाजराच्या रसामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजांसह आवश्यक पोषक घटक असतात, जे केवळ प्रतिकारशक्ती वाढवत नाहीत तर इतर आरोग्य फायदे देखील देतात.

Follow Us
जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो - CM फडणवीस
जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो - CM फडणवीस.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला....
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला.....
आदिती तटकरेंचे सचिव महिलांसोबत अर्वाच्च भाषेत... रोहिणी खडसेंचा खळबळजन
आदिती तटकरेंचे सचिव महिलांसोबत अर्वाच्च भाषेत... रोहिणी खडसेंचा खळबळजन.
आम्ही घरी जाऊन पाठिंबा दिला म्हणून तुम्ही मुख्यमंत्री बनलात...
आम्ही घरी जाऊन पाठिंबा दिला म्हणून तुम्ही मुख्यमंत्री बनलात....
सुप्रिया सुळेंनी अचानक घेतली सोनिया गांधींची भेट, दिल्लीत नेमकं काय...
सुप्रिया सुळेंनी अचानक घेतली सोनिया गांधींची भेट, दिल्लीत नेमकं काय....
विधानपरिषद निवडणूक : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्मुला काय? मंत्री...
विधानपरिषद निवडणूक : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्मुला काय? मंत्री....
NEET पेपरफुटी प्रकरणी तिसऱ्या मनीषाचं मोठं कांड समोर, थेट NTA...
NEET पेपरफुटी प्रकरणी तिसऱ्या मनीषाचं मोठं कांड समोर, थेट NTA....
मुख्यमंत्र्यांच्या मुंबईते शिर्डी प्रवासादरम्यानच्या त्या कृत्याने...
मुख्यमंत्र्यांच्या मुंबईते शिर्डी प्रवासादरम्यानच्या त्या कृत्याने....
धक्कादायक! थेट घरात घुसून 25 वर्षीय महिलेचा विनयभंग अन्... नाशिकच्या..
धक्कादायक! थेट घरात घुसून 25 वर्षीय महिलेचा विनयभंग अन्... नाशिकच्या...
मोठी खळबळ! घराचा नकाशा, संवेदनशील माहिती अन्... थेट डॉनाल्ड ट्रम्प...
मोठी खळबळ! घराचा नकाशा, संवेदनशील माहिती अन्... थेट डॉनाल्ड ट्रम्प....