AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chilblains | हिवाळ्याच्या दिवसांत होतोय ‘चिल ब्लेन’चा त्रास, जाणून घ्या याची लक्षणे आणि उपाय!

भारतात सतत थंडीची लाट वाढत आहे. बर्‍याच ठिकाणी पारा शून्यावरुन खाली आला असून, थंडीमुळे जनजीवन विचलित होत आहे.

Chilblains | हिवाळ्याच्या दिवसांत होतोय ‘चिल ब्लेन’चा त्रास, जाणून घ्या याची लक्षणे आणि उपाय!
| Updated on: Jan 01, 2021 | 6:37 PM
Share

मुंबई : भारतात सतत थंडीची लाट वाढत आहे. बर्‍याच ठिकाणी पारा शून्यावरुन खाली आला असून, थंडीमुळे जनजीवन विचलित होत आहे. अशा परिस्थितीत ‘चिल ब्लेन’ नावाच्या सर्दी-ताप तापाचा आणखी एक आजार होण्याची शक्यता वाढली आहे. ‘चिल ब्लेन’ हा काही नवीन आजार नाही. हिवाळ्यात होणारा हा एक सामान्य रोग आहे. विशेषत: ज्या महिला थंडीत काम करण्यासाठी बाहेर पडतात, त्यांना याचा धोका अधिक असतो. अनेकांना या आजाराबाबत माहिती नसते (Chilblain problem during winter season know the symptoms and precautions).

चिल ब्लेनचा वाढता धोका पाहता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानेही याबाबत एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. हा अ‍ॅनिमेटेड व्हिडीओ रोगाची कारणे, उपाय आणि लक्षणे स्पष्ट करतो. कोल्ड वेव्हमुळे होणाऱ्या या आजाराचा मुलांवर आणि स्त्रियांवर अधिक परिणाम होतो.

चिल ब्लेन म्हणजे काय?

वास्तविक, हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त वेळा थंड हवेच्या संपर्कात आल्याने, हात-पाय आणि शरीराच्या छोट्या रक्तवाहिन्या सूजतात, यालाच चिल ब्लेन म्हणतात. या आजारामुळे हातापायाची बोटं आणि बर्‍याच केसेसमध्ये कानाचा खालचा भाग सुजल्याचे दिसून आले आहे. दरम्यान काही जणांमध्ये गाल आणि चेहऱ्यावर देखील सूज दिसली आहे.

याची लक्षणे कोणती?

जर हातापायाच्या बोटांवर किंवा गालावर अचानक तीव्र खाज, जळजळ होत असेल तर ती या आजाराची सुरुवात असू शकते. याव्यतिरिक्त तीव्र वेदना आणि खाज आल्यामुळे तो भागही हलका लाल होतो. वास्तविक, तीव्र थंडीत अचानक गरम वातावरण तयार झाल्यास ही समस्या निर्माण होते (Chilblain problem during winter season know the symptoms and precautions).

काय कराल?

जर आपल्यालाही अशीच समस्या जाणवत असेल, तर मग नखांनी ओरखडे न लावता, त्या भागाला कापडाने चोळा. तसेच, बर्‍याचदा लोक थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आगीच्या किंवा शेकोटीच्या शेजारी जाऊन बसतात, जे पूर्णपणे चुकीचे आहे. थंडीत ‘चिल ब्लेन’ची समस्या उद्भवल्यास आगीजवळ किंवा शेकोटीजवळ बसून ऊब घेऊ नका. अन्यथा तुमची ‘चिल ब्लेन’ची समस्या आणखी वाढू शकते.

या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी गरम पाण्यात थोडे मीठ घाला आणि त्यात हात पाय काही वेळासाठी बुडवून ठेवा. जर आपल्या समस्येने तीव्र रूप धारण केले असेल तर सर्वात आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच, शीतलहरीत कोणत्याही पूर्व तयारीशिवाय घराबाहेर पडू नका आणि थंडीत शक्यतो बाहेर जाणे टाळा.

खबरदारीसाठी काय कराल?

दुचाकी चालवताना हातमोजे आणि पायातही मोजे घाला. महिलांनी घरी वावरताना मोजे घालण्याबरोबरच कापडी बूटदेखील वापरायला हवेत. शक्यतो हातपाय थंड पाण्यापासून सुरक्षित ठेवा. शीतलहर सुरु असताना प्रवास करणे टाळा आणि आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा.

(Chilblain problem during winter season know the symptoms and precautions)

नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.