फुफ्फुसांसाठी सर्वात घातक आहे कोरोना, या गोष्टी टाळा आणि श्वसन प्रणाली निरोगी ठेवा

| Updated on: Apr 28, 2021 | 8:42 AM

जेव्हा रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसतात तोपर्यंत कोरोनाने फुफ्फुसाचे सुमारे 25% चे नुकसान केलेले असते. म्हणूनच फुफ्फुसाचे आरोग्य फार महत्वाचे आहे. (Corona is the most dangerous for the lungs, avoid these things and keep the respiratory system)

फुफ्फुसांसाठी सर्वात घातक आहे कोरोना, या गोष्टी टाळा आणि श्वसन प्रणाली निरोगी ठेवा
फुफ्फुसांसाठी सर्वात घातक आहे कोरोना
Follow us on

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट अत्यंत प्राणघातक आहे, हा विषाणू इतका शक्तिशाली आहे की तो महत्त्वपूर्ण अवयवांवर परिणाम करीत आहे. त्याचे बहुतेक दुष्परिणाम फुफ्फुसांवर दिसून येतात. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसतात तोपर्यंत कोरोनाने फुफ्फुसाचे सुमारे 25% चे नुकसान केलेले असते. म्हणूनच फुफ्फुसाचे आरोग्य फार महत्वाचे आहे. (Corona is the most dangerous for the lungs, avoid these things and keep the respiratory system healthy)

फ्रिजमधील थंड पाणी टाळा

उन्हाळ्यात थंड पाणी, पेये प्यावेसे वाटते. मात्र थंड पाण्यामुळे घसा बसतो आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो. यामुळे श्वसन प्रणालीवर परिणाम होतो. म्हणूनच कोरोना संक्रमणाच्या काळात नॉर्मल किंवा कोमट पाणी पिण्याचा डॉक्टर सल्ला देतात.

सॉफ्ट ड्रिंकपासून दूर रहा

कोल्ड ड्रिंकमध्ये कोणतीही पोषक तत्वे नसतात, त्यात केवळ साखर आणि बर्‍याच कॅलरी असतात. हे पिण्यामुळे वजन वाढते आणि पोट फुगते. याचे सेवन केल्याने घसा खवखवतो.

गॅस्ट्रिक भाज्या हानिकारक

ज्यांना फुफ्फुसाचा आजार आहे त्यांच्यासाठी गॅस आणि सूज अशा समस्या घातक ठरु शकतात. कोबी, ब्रोकोली, मुळा आणि फ्लॉवर यासारख्या भाज्या पोषक तत्वे आणि फायबर समृद्ध असतात, परंतु या भाज्या खाल्ल्यानंतर आपल्या पोटात गॅस निर्माण होतो, त्यामुळे अशा भाज्या कमी प्रमाणात खा.

तळलेले पदार्थ टाळा

तळलेल्या पदार्थांमुळे पोटात सूज येते, ज्यामुळे श्वास घेण्यास अडचण येते. तळलेले पदार्थ खाल्ल्याने लठ्ठपणा देखील वाढतो आणि यामुळे फुफ्फुसांवर दबाव वाढतो. तळलेले पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असतात. हे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढतो.

डेअरी उत्पादने कमी प्रमाणात खा

दूध शरीरासाठी पौष्टिक असते, यातील कॅल्शियम आपल्या शरीराचे पोषण करते, परंतु दुधात कॅसोमोर्फिन देखील असते. त्यामुळे फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी डेअरी उत्पादने चांगली मानली जात नाहीत. कारण यामुळे आजाराची लक्षणे आणखीनच वाढतात. म्हणूनच त्यांचे अल्प प्रमाणात सेवन करणे चांगले आहे.

मीठाचे सेवन कमी करा

अनेक लोकांना चटपटीत पदार्थ फार आवडतात. मात्र अधिक प्रमाणात मीठ आपल्या फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. मीठामुळे वॉटर रिटेंशनची समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे श्वासोच्छवासाची समस्या उद्भवू शकते, म्हणून मीठाचे सेवन कमी केले पाहिजे. (Corona is the most dangerous for the lungs, avoid these things and keep the respiratory system)

इतर बातम्या

अमेरिकेचीही ‘मास्कमुक्ती’कडे वाटचाल, लस टोचून घेतलेले नागरिक मास्कशिवाय फिरु शकणार

धक्कादायक! पत्नीच्या निधनाचे वृत्त समजताच काही तासातच पतीनेही सोडले प्राण