
भात भारतीय पदार्थांमधला एक मुख्य घटक मानला जोते. अनेकजण त्यांच्या दररोजच्या आहारामध्ये भाताचे सेवन करतात. अशा व्यक्तींना भात खाल्लयाशिवाय त्यांचे जेवण अपूर्ण वाटते. बिर्याणि असो किंवा पुलाव आजकाल भाताचे अनेक प्रकार बनवले जातात. परंतु अनेकांना आजही असे वाटते की भात खाल्ल्यामुळे वजन वाढते त्यामुळे अनेकजण भात खाण्यास टाळतात. ज्या लोकांना मधुमेह किंवा लठ्ठपणाच्या समस्या अस्तील अशा लोकांना भाताचे सेवन खाण्यास मनाई असते. भातामुळे रक्तातील साखर वाढते ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. त्यासोबतच भातामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात ज्यामुळे तुमच्या शरीरातील लठ्ठपमा वाढतो.
परंतु, योग्य प्रमाणात भाताचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्याला फायदे देखील होतात. भातामध्ये भरपूर प्रमाणात पायबर असते ज्यामुळे तुमची पचनक्रिया मजबूत होते. अनेकांच्या घरामध्ये दुपारी आणि रात्री दोन्ही वेळा भात शिजवला जातो. त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये पडणारा प्रश्न म्हणजे भात खाण्याची योग्य वेळ कोणती? ;चला तर मग जाणून घेऊया तज्ञांच्या मते भात खाण्याची योग्य वेळी काय आहे?
भात खाण्याची उत्तम वेळ :
तज्ञांच्या मते तुम्ही कोणत्याही वेळी भाताचे सेवन करू शकता. भात खाण्याची अशी कोणतीही ठरावीक वेळ नाही. त्यासोबतच भातामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास देखील मदत होते. आजारी व्यक्तींना किंवा लहान मुलांना सुरूवातीला भाताची पेज किंवा खिचडी खाण्याचा सल्ला दिला जातो त्याचे मुख्य कारण म्हणजेच भात पचनासाठी हलका असतो आणि त्यांच्यामुळे पचनसंस्था सुधारते.
तुम्ही जर तुमच्या आहारामध्या भात खाणं बंद केलं तर त्याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. भात पूर्णत: बंद केल्यामुळे तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. भात खाणं बंद केल्यास तुमच्या शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात. त्योसबतच शरीरातील कॉर्टिसॉल नावाचा घटक वाढतो. भाताचे सेवन बंद केल्यामुळे तुमच्या शरीरातील साखरेची पातळी कमी होते आणि तुम्हाला चक्कर आणि मळमळ सारख्या समस्या होण्याची शक्यता असते. भात न खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकरारकशक्ती कमकुवत होते आणि तुमच्या पचनक्रियेवर देखील गंभीर परिणाम होऊ शकतो. तुम्ही जर नियमित प्रमाणामध्ये भाताचे सेवन केले तर तुमचं वजन देखील नियंत्रित राहाण्यास मदत होते. तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारामध्ये 1 कप भाताचे सेवन करू शकता
भात खाण्याचे फायदे :
भात शिजवताना त्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी मिसळा
भात शिजवण्यापूर्वी स्वच्छ धुवा त्यामुळे स्टार्चची मात्रा कमी होते.
भातामध्ये तूप मिसळून खाल्ल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.
भाताचे नियमित सेवन केल्यास तुमच्या त्वचेचं आणि केसांचे आरोग्य निरोगी राहाते.