Ambani Family : इस्रायलचे गार्ड अंबानी कुटुंबाला देतात सुरक्षा, खर्च जाणून व्हाल थक्क

Ambani Family : सिक्योरिटीवरच अंबानी कुटुंबाचा होतो इतका खर्च, अंबानीच्या सुरक्षेसाठी इस्रायलचे गार्ड असतात तैनात, त्यांचा खर्च जाणून तुम्ही व्हाल थक्क... अंबानी कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतं चर्चेत... आता मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या गार्डचा खर्च जाणून तुम्ही व्हाल थक्क

Ambani Family : इस्रायलचे गार्ड अंबानी कुटुंबाला देतात सुरक्षा, खर्च जाणून व्हाल थक्क
Follow us
| Updated on: Nov 05, 2023 | 8:57 AM

मुंबई | 5 नोव्हेंबर 2023 | देशाचे सर्वात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांच्या कुटुंबाची चर्चा कायम सर्वत्र रंगलेली असते. अंबानी कुटुंब देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. अंबानी कुटुंबाची प्रत्येक गोष्ट सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अंबानी कुटुंब होणाऱ्या कार्यक्रमांवर आणि इतर गोष्टींवर देखील अफाट पैसा खर्च करतं. पण अंबानी कुटुंबाला असलेलं संरक्षण देखील सध्या चर्चेचा विषय आहे. मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संरक्षणासाठी CRPF चे 25 कमांडो 24 तास तैनात असतात. CRPF चे कमांडो अधुनिक हत्यारांसोबत अंबानी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी तैनात असतात.

अंबानी यांच्या सुरक्षेसाठी असलेले CRPF चे कमांडो यांच्या फोर्समध्ये हत्यारांसोबत असलेले गार्ड, ड्रायव्हर, त्यांच्यासोबत चालणारे गार्ड, पर्सनल सिक्योरिटी ऑफिसर आणि झडती घेणाऱ्या टीमचा देखील समावेश आहे. अंबानी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले जवान दोन शिफ्टमध्ये काम करतात. CRPF चे जवान अंबानी याच्या घरा भावती होत असलेल्या हलचालींवर नजर ठेवून असतात.

CRPF च्या जवानांशिवाय अंबानी यांच्याकडे खासगी 15 ते 20 सिक्योरिटी गार्ड आहेत. त्यांना इस्रायलच्य सिक्योरिटी फर्मने ट्रेन केलं आहे. अंबानी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले इस्रायलचे जवान मार्शल आर्टमध्ये माहिर आहेत. अंबानी स्वतःच्या सुरक्षेसाठी बुलेटप्रूफ BMW मध्ये फिरतात, तर त्यांचे सिक्योरिटी गार्ड रेंज रोव्हर या महागड्या गाडीत असतात.

अंबानी यांच्या सुरक्षेसाठी CRPF आणि खासगी सिक्योरिटी गार्ड्सच्या सहा ते आठ गाड्यांचा ताफ तैनात असतो. मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला मिळालेल्या झेड प्लस सिक्योरिटीवर तब्बल 15 ते 20 लाख रुपये खर्च येतो. हा खर्च खुद्द अंबानी करतात. यामध्ये सिक्योरिटी गार्ड यांचं मानधन आणि तैनात असलेल्या गाड्याचा खर्च असतो.

मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला झेड प्लस सिक्योरिटी असतेच, पण त्यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जामनगर स्थित रिफायनरीच्या सुरक्षेची जबाबदारी CIFS वर आहे. यासाठी तब्बल 34 लाख खर्च अंबानी यांच्याकडून केला जातो. अंबानी कुटुंब कायम त्यांच्या रॉयल लाईफ स्टाईलमुळे चर्चेत असतं. एवढंच नाही तर, अंबानी कुटुंबाबद्दल जाणून घेण्यासाठी देखील चाहते उत्सुक असतात.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.