Hair Care Tips : केसांमधील कोंडा काढण्यासाठी दही आणि लिंबू अत्यंत फायदेशीर, वाचा

| Updated on: Jun 07, 2021 | 9:18 AM

केसांमध्ये होणाऱ्या कोंड्यामुळे अनेकजण त्रस्त आहेत. केसांत कोंडा होण्याची समस्या खूप सामान्य आहे.

Hair Care Tips : केसांमधील कोंडा काढण्यासाठी दही आणि लिंबू अत्यंत फायदेशीर, वाचा
या घरगुती कंडीशनरमुळे आपले केस मुलायमदार आणि सुंदर दिसतील. (टीप – कोणत्याही वैद्यकीय, आयुर्वेदिक सल्ल्याचं पालन करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Follow us on

मुंबई : केसांमध्ये होणाऱ्या कोंड्यामुळे अनेकजण त्रस्त आहेत. केसात कोंडा होण्याची समस्या खूप सामान्य आहे. परंतु, जर आपण ही समस्या वेळेत सोडवली नाही तर, ती कायम स्वरूपी त्रासदायक ठरू शकते. डोक्यातील कोंड्यामुळे फक्त आपले केस खराब नाहीत. तर, त्यासोबतच आपल्या चेहर्‍यावर, पाठीवर, खांद्यावरही बर्‍याच समस्या वाढतात. केसांमधील कोंडा काढण्यासाठी आज आम्ही काही खास टिप्स सांगणार आहोत. (Curd and lemon are beneficial for removing dandruff)

केसांमधील कोंडा काढण्यासाठी दही आणि लिंबू अत्यंत फायदेशीर आहेत. यासाठी आपल्याला एक वाटी दही घ्यावे लागेल आणि त्यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस मिक्स करावा लागेल. ही पेस्ट आपल्या संपूर्ण केसांसह टाळूला देखील लावा. साधारण वीस ते तीस मिनिटे ही पेस्ट केसांवर लावा आणि त्यानंतर केस धुवा. यामुळे केसातील कोंडा दूर होण्यास मदत होईल. ही दही आणि लिंबूची पेस्ट आपण जर सतत एक महिना लावली तर केसांतील कोंडाची समस्या कायमची दूर होईल.

कोंड्याची समस्या मिटवण्यासाठी लिंबू आणि नारळ तेल उपयोगी ठरते. यासाठी आपल्याला 2-3 चमचे नारळ तेल आणि एका लिंबाची आवश्यकता आहे. प्रथम एका वाडग्यात 2 ते 3 चमचे नारळाचे तेल घ्या आणि त्यात लिंबाचा रस घाला. जेव्हा दोन्ही घटक चांगले मिसळले जातील, तेव्हा हे मिश्रण कॉटन बॉलच्या सहाय्याने केसांच्या मुळांवर लावा.

आपल्या केसांतील कोंड्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. प्रत्येक वेळी या समस्येचे फक्त एकच कारण असणे आवश्यक नाही. त्याचप्रमाणे, एकाच वेळी वेगवेगळ्या लोकांमध्ये डोक्यातील कोंडाची कारणे देखील भिन्न असू शकतात. परंतु तरीही डोक्यात कोंडा होण्याची सर्वात सामान्य कारणे खालीलप्रमाणे आहेत. मुळांमध्ये पोषण नसणे, त्वचेची पीएच पातळी बिघडणे, शरीरात पाण्याचा अभाव, रासायनिक उत्पादनांचा अधिक वापर, स्काल्प स्वच्छ न ठेवणे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Curd and lemon are beneficial for removing dandruff)