रात्री झोपण्यापूर्वी ‘या’ 4 गोष्टी आजिबात करू नका, नाहीतर हळूहळू वाढत जातील ‘हे’ आजार
रात्रीची चांगली झोप घेणे हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. मात्र आपल्या काही चुकांमुळे रात्री लवकर झोप न येण्याच्या समस्या निर्माण होतात. म्हणूनच, जर तुम्हीही रात्री झोपण्यापूर्वी या 4 चुका करत असाल तर तुम्ही आजपासूनच त्या दुरुस्त कराव्यात.

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या काही सवयी या बदलत चालेल्या आहेत, ज्या की आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. विशेषत: झोपण्याआधीच्या काही वाईट सवयींचा शरीरावर मोठा परिणाम होतो. म्हणून नेहमी चांगली झोप घेणे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. मात्र, आपण झोपण्यापूर्वी अशा अनेक गोष्टी करतो, ज्यामुळे निद्रानाश किंवा वारंवार जागे होण्याची समस्या उद्भवू शकते. म्हणून, झोपण्यापूर्वी काही गोष्टी अजिबात करू नयेत. तर तुम्ही या सवयी लवकरच सोडल्या पाहिजेत, अन्यथा त्या भविष्यात मोठ्या आरोग्यासंबंधीत समस्यांना कारणीभूत ठरू शकतात. चला तर मग आजच्या या लेखात झोपण्यापूर्वी कोणत्या चुका टाळ्या पाहिजेत ते जाणून घेऊयात…
झोपण्यापूर्वी जड व मसालेदार पदार्थांचे सेवन
बहुतेक लोकं रात्रीच्या जेवणातही मसालेदार आणि तेलकट असे जड अन्नपदार्थ खातात. त्यामुळे असे अन्न खाल्ल्याने पचनसंस्थेवर दबाव येतो आणि ॲसिडिटी, छातीत जळजळ, अपचन आणि पोटफुगी यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच, रात्री उशिरा जेवल्याने इन्सुलिनची पातळी देखील वाढते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. म्हणून, झोपण्यापूर्वी 2-3 तास आधी हलके आणि सहज पचणारे अन्न खा. रात्री भूक लागली तरी केळी किंवा मखाना सारखे निरोगी स्नॅक्सचे सेवन करा.
झोपण्यापूर्वी फोन किंवा लॅपटॉप तसेच टीव्ही पाहणे
आजकाल बहुतेक लोकं झोपण्यापूर्वी सोशल मीडियावर पोस्ट पाहतात किंवा मोबाईल फोन किंवा लॅपटॉपवर चित्रपट पाहतात. पण यांच्या स्क्रिनमधुन निघणारा निळ्या प्रकाशामुळे मेलाटोनिन हार्मोनचे उत्पादन कमी होते, ज्यामुळे निद्रानाशाची समस्या निर्माण होते. म्हणून, झोपण्यापूर्वी किमान 1 तास आधी फोन आणि लॅपटॉप वापरणे थांबवा. आवश्यक असल्यास, नाईट मोड किंवा ब्लू लाईट फिल्टर वापरा.
रात्री चहा आणि कॉफीचे सेवन करणे
आपल्यापैकी अनेकांना रात्री उशिरा चहा आणि कॉफी पिण्याची सवय असते. तर तुम्ही पित असलेल्या चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असते जे आपल्याला त्वरित ऊर्जा देते, त्यामुळे आपली झोप देखील दूर करते. जर तुम्ही रात्री चहा आणि कॉफी प्यायली तर ते तुमच्या झोपेची गुणवत्ता खराब करू शकते. कॅफिनचा प्रभाव 4-6 तास टिकतो, ज्यामुळे बराच वेळ जागे राहण्याची समस्या उद्भवू शकते. जर तुम्हाला चहा प्यायचा असेल तर ग्रीन टी किंवा हर्बल टी प्या, ज्यामध्ये कमी कॅफिन असते. तुम्ही रात्री गरम दूध किंवा हळदीचे दूध पिऊ शकता, ते झोप येण्यास मदत करते.
झोपण्यापूर्वी खूप ताण घेणे
ताण आणि चिंता हे झोपेचे सर्वात मोठे शत्रू आहेत. झोपण्यापूर्वी जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा ताण आला तर ते कॉर्टिसोल हार्मोन सोडते, ज्यामुळे झोपेचा त्रास होतो. जास्त काळ ताणतणाव राहिल्याने पचनसंस्थेलाही हानी पोहोचू शकते आणि निद्रानाशाची समस्या वाढू शकते. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी, खोल श्वास किंवा ध्यान करा, यामुळे मन शांत होते. याशिवाय, संगीत ऐकल्याने ताण कमी होतो.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
