Dark Circles पासून सुटका कशी मिळवायची? ‘हे’ आहेत घरगुती उपाय

माणूस कितीही सुंदर असला तरी डोळ्यांखाली असणारी काळी वर्तुळे सगळं बिघडवू शकतात. बरेचदा तर ज्याला हे डार्क सर्कल्स असतात तोच माणूस हे घालवण्याचा इतका प्रयत्न करत असतो की बास्स! तरीही कितीही उपाय केले तरी डार्क सर्कल्स काय कमी होत नाही. हे काही उपाय आहेत जे एकदा नजरेखालून घाला, काय माहित कोणता उपाय खरंच जादू करेल?

Dark Circles पासून सुटका कशी मिळवायची? 'हे' आहेत घरगुती उपाय
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 9:15 PM

मुंबई: डोळ्यांखालची काळी वर्तुळे ही केवळ महिलांसाठीच नव्हे तर पुरुषांसाठीही मोठी समस्या आहे. हे जास्त स्क्रीन पाहणे, खूप कमी झोप, तणाव आणि इतर अनेक कारणांमुळे असू शकते. जर तुम्हीही डार्क सर्कल्सने त्रस्त असाल तर दुधाचा वापर करून तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता, कारण डार्क सर्कलच्या उपचारासाठी दूध खूप फायदेशीर आहे. यात त्वचा उजळवणारे गुणधर्म असतात.

डोळ्यांखाली काळी वर्तुळे का असतात?

डोळ्यांखाली काळी वर्तुळे येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यामध्ये अनुवांशिक, वृद्धत्व, कोरडी त्वचा, खूप रडणे, संगणकासमोर जास्त वेळ काम करणे, मानसिक आणि शारीरिक तणाव, झोपेची कमतरता आणि पौष्टिक आहाराचा अभाव यांचा समावेश आहे.

डार्क सर्कल्सपासून सुटका कशी मिळवायची?

1. बदाम तेल आणि दूध

  • थंड दुधात थोडे बदामाचे तेल घालावे.
  • या तयार मिश्रणात कापसाचे दोन बोळे बुडवून ठेवा.
  • कापसाचे बोळे डोळ्यांवर अशा प्रकारे ठेवा की ते काळी वर्तुळे झाकून घेतील
  • 15-20 मिनिटे ठेवा हे बोळे
  • यानंतर ताज्या पाण्याने धुवून घ्या.
  • हा उपाय दररोज करा.

2. थंड दूध

  • सर्वप्रथम एका बाऊलमध्ये थोडे थंड दूध घ्या.
  • त्यानंतर त्यात कापसाचे दोन बोळे भिजत ठेवावे.
  • कापसाचे बोळे डोळ्यांच्यावर अशा प्रकारे ठेवा की यामुळे काळी वर्तुळे झाकली जातील.
  • बोळे 20 मिनिटे ठेवा.
  • आता कापसाचे बोळे काढून टाका.
  • त्यानंतर चेहरा ताज्या पाण्याने धुवून घ्यावा.
  • आपण दररोज तीन वेळा हे करू शकता.

3. गुलाबजल आणि दूध

  • थंड दूध आणि गुलाबजल समप्रमाणात मिसळा.
  • मिश्रणात दोन कॉटन पॅड भिजत ठेवा.
  • त्यांना आपल्या डोळ्यांच्या वर ठेवा.
  • डार्क सर्कल लावून झाकून ठेवा.
  • 20 मिनिटे ठेवा.
  • कॉटन पॅड काढून ताज्या पाण्याने डोळे धुवा.
  • डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी आठवड्यातून 3 वेळा दुधासोबत ही प्रक्रिया करावी.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.