मधुमेहासाठी सगळ्यात उत्तम आहे कांदा, वाचा फायदे आणि खाण्याच्या पद्धती

या दोन्ही समस्या मेटाबोलिक डिसऑर्डरमुळे उद्भवतात. यामध्ये, रक्तातील साखरेची पातळी एकतर सामान्यपेक्षा फार जास्त होते किंवा कमी होते.

मधुमेहासाठी सगळ्यात उत्तम आहे कांदा, वाचा फायदे आणि खाण्याच्या पद्धती

मुंबई : शरीरात साखरेची पातळी (Sugar level) वाढणं आणि कमी होणं म्हणजे मधुमेहाची (Diabetes) लक्षणं आहेत. या दोन्ही समस्या मेटाबोलिक डिसऑर्डरमुळे उद्भवतात. यामध्ये, रक्तातील साखरेची पातळी एकतर सामान्यपेक्षा फार जास्त होते किंवा कमी होते. हा आजार इतका गंभीर आहे की याचे जगभरात तब्बल 425 दशलक्ष रुग्ण आहेत. मधुमेहामुळे शरीरात इतरही अनेक आजार उद्भवतात. यामुळे आपल्य आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहिला. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याचा एक विशेष मार्ग म्हणजे कच्चा लाल कांदा खाणे. (diabetes care plan onion will help control blood sugar level health news)

डायबेटिजसाठी कांदा फायद्याचा असल्याचं समोर आलं आहे. कांद्यामध्ये उपस्थित अँटीऑक्सिडंट्स रक्तातील ग्लुकोज (Blood Glucose) नियंत्रित करतं. 100 ग्रॅम लाल कांदा फक्त 4 तासात रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याचं काम करतो. हिरव्या कांदाही आहारात चांगला आहे.

कांद्यामध्ये फोलिकल्स, सोडियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वं अ, सी, ई मोठ्या प्रमाणात असतात. यामध्ये फायबरची चांगली मात्रा असते ज्यामुळे अन्न पचन होतं. तर कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण खूप कमी असल्यामुळे रक्तातील ग्लूकोजची पातळी कमी होते. ज्यामुळे रक्तातील साखर पातळीवरील नियंत्रणात राहते.

कसा खाल कांदा?

– तुम्ही सँडविज करून कच्चा कांदा खाऊ शकता.

– सलाडमध्येही लाल कांदा खाणं शरीरासाठी चांगलं आहे.

– लाल खांद्याला वाटून, पाण्यामध्ये मिक्स करा. त्यामध्ये लिंबू आणि सेंधा मीठ टाकून ते प्या.

– तुम्ही कांद्याचं सूपही बनवू शकता.

– तुम्ही भांज्यामधूनही कांदा खाऊ शकता.

– हिरवा कांदाही तुम्ही सलाड म्हणून किंवा इतर भाज्यांमध्ये वापरून खाऊ शकता.

(टीप : या बातमीमध्ये लिहलेली माहिती ही सामान्य माहितीच्या आधारे आहे. तुम्ही याचा प्रयोग करताना काळजी घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या) (diabetes care plan onion will help control blood sugar level health news)

संबंधित बातम्या –

Diabetes | मधुमेहावर गुणकारी ‘आंब्याची पाने’, अशाप्रकारे वापर केल्याने होईल फायदा!

गरोदरपणात थायरॉईडची समस्या आहे? मग अजिबात निष्काळजीपणा करु नका

त्वचेसाठी खूप फायद्याचा आहे बेकिंग सोडा, अशी पेस्ट बनवून लावाल तर सौंदर्य आणखी खुलेल…

(diabetes care plan onion will help control blood sugar level health news)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI