गरोदरपणात थायरॉईडची समस्या आहे? मग अजिबात निष्काळजीपणा करु नका

गरोदरपणात थायरॉईडची समस्या आहे? मग अजिबात निष्काळजीपणा करु नका (do not neglect thyroid during pregnancy Get proper treatment)

गरोदरपणात थायरॉईडची समस्या आहे? मग अजिबात निष्काळजीपणा करु नका

मुंबई : हायपरथायरॉईडीझम आणि हायपोथायरॉईडीझम ही गरोदरपणात सामान्य समस्या आहेत. परंतु त्यावर उपचार करणे गरजेचे आहे, कारण थायरॉईडची पातळी असंतुलित झाल्यास आई आणि बाळ दोघांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. हेच कारण आहे की जेव्हा एखादी महिला गर्भवती होते किंवा गर्भधारणेबाबत प्लॅनिंग करते तेव्हा डॉक्टर प्रथम तिला थायरॉईड चाचणी करण्याचा सल्ला देतात. वास्तविक थायरॉईड ही आमच्या मानेच्या पुढच्या भागामध्ये फुलपाखरूच्या आकाराच्या ग्रंथी आहे, जी टी 3 आणि टी 4 नामक हार्मोन्स रिलिज करते. हे दोन्ही संप्रेरक शरीरात चयापचय, पचन प्रक्रिया, वजन, हृदय गती, स्नायूंचा समूह आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात. हे हार्मोन्स असंतुलित झाल्यास वजन कमी किंवा जास्त होते. या स्थितीलाच थायरॉईड नावाने ओळखले जाते. जेव्हा थायरॉईड ग्रंथी गरजेपेक्षा कमी हार्मोन्सची निर्मिती करते तेव्हा याला हायपोथायरॉईडीझम म्हटले जाते आणि जेव्हा गरजेपेक्षा अधिक हार्मोन्सची निर्मिती करते तेव्हा याला हायपरथायरॉईडीझम म्हटले जाते. (do not neglect thyroid during pregnancy Get proper treatment)

हायपोथायरॉईडीझमची लक्षण

चेहऱ्यावर सूज येणे, त्वचेत घट्टपणा जाणवणे, जास्त थकवा येणे, नाडीची गती कमी होणे, जास्त बद्धकोष्ठता, थंडीचा अभाव, वजन वाढणे, शरीरावर पेटके येणे, पोटात बिघाड, कामात लक्ष न लागणे किंवा स्मृती कमजोर होणे, टीएसएचची पातळी वाढणे आणि टी 4 ची पातळी कमी होणे.

हायपरथायरॉईडीझमचे लक्षण

थकवा, उल्टी येणे, ह्रदयाची गती वाढणे, भूक कमी किंवा अधिक होणे, चक्कर येणे, घाम अधिक येणे, नजर कमजोर होणे, जर डायबिटीज असेल तर ब्लड शुगर वाढणे, पोट बिघाड होणे, वजन कमी होणे.

इलाज न केल्यास होऊ शकतात समस्या

योग्य वेळी उपचार न केल्यास महिलांना उच्च रक्तदाब, अशक्तपणा, गर्भपात, बाळाचे वजन कमी असणे, बाळाची मानसिक वाढ न होणे, वेळेआधी डिलिव्हरी अशा समस्या निर्णाण होऊ शकतात.

काय कराल?

1. तज्ञांच्या निर्देशांचे पालन करा
2. औषधे वेळेवर खा
3. डॉक्टरांच्या सल्ल्याने दररोज व्यायाम करा
4. योग प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली योग व मेडिटेशन करु शकता
5. रोज थोडा वेळ अवश्य चाला (do not neglect thyroid during pregnancy Get proper treatment)

 

 

इतर बातम्या

Toothache | या कारणांमुळे दातात होतात वेदना, हे घरगुती उपाय देतील आराम

PM Kisan: 2.89 कोटी शेतकरी किसान सन्मान योजनेपासून वंचित, तुम्हाला पैसे मिळाले का?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI