Toothache | या कारणांमुळे दातात होतात वेदना, हे घरगुती उपाय देतील आराम

Toothache | या कारणांमुळे दातात होतात वेदना, हे घरगुती उपाय देतील आराम (these home remedies will eliminate toothache)

  • Updated On - 6:35 pm, Sun, 21 February 21
Toothache | या कारणांमुळे दातात होतात वेदना, हे घरगुती उपाय देतील आराम
पिवळे दात

मुंबई : दातदुखी ही एक सामान्य समस्या आहे परंतु काही वेळा त्याचा त्रास असह्य होतो. दातदुखीमुळे बहुतेकदा चेहऱ्यावर सूज येते आणि डोके देखील दुखू लागते. सहसा दातदुखी खूप गरम किंवा थंड अन्न खाण्यामुळे, दात स्वच्छ न ठेवणे, कॅल्शिअमची कमतरता, बॅक्टेरीयाचा संसर्ग किंवा दाताची मुळे कमकुवत झाल्यामुळे उद्भवते. बहुतेक लोक दातदुखीचा तीव्र त्रास असल्यास पेन किलर किंवा अँटीबायोटिक्स घेतात. मात्र काही घरगुती उपचारांनी दातदुखीपासून सुटका करू शकतात. (These home remedies will eliminate toothache)

लवंग

दातदुखीमध्ये लवंगाचा वापर अत्यंत प्रभावी मानला जातो. दाताखाली लवंग दाबल्याने वेदना कमी होते. दातदुखीमध्ये लवंग तेल देखील फायदेशीर आहे.

कच्चा लसूण चावा

लसूणमध्ये एलिसिन कंपाऊंड असते जे अँटीबॅक्टीरियल, अँटीवायरल आणि अँटीफंगल गुणांनी समृद्ध आहे. दातात वेदना होत असतील तर कच्चा लसूण चावा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

हळदीमुळे मिळेल आराम

हळदी नैसर्गिक अँटीबायोटिक मानली जाते. हळद, मीठ आणि मोहरीच्या तेलाची पेस्ट बनवा. ही पेस्ट दातावर लावा वेदना कमी होतील. हळदीची ही पेस्ट दाताच्या वेदनेवर औषध आहे.

हिंग

हिंगाचा उपयोग जेवणात चव आणि सुंगध यावा यासाठी केला जातो. मात्र हिंग अनेक प्रकारच्या घरगुती उपचारांमध्ये उपयुक्त आहे. जर तुमच्या दातात वेदना होत आसतील तर चिमूटभर हिंग लिंबाच्या रसात मिक्स करुन कापसाच्या सहाय्याने दातावर लावा. यामुळे वेदना कमी होतील.

कच्चा कांदा चावा

कांद्यात अँटी-इंफ्लेमेटरी अँटी-एलर्जिक, अँटी-कार्सिनोजेनिक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. हे तोंडातील विषाणू नष्ट करतात. ज्या दातात वेदना होत असेल त्या दाताने कच्चा कांदा हळूहळू चावा, तुम्हाला आराम मिळेल.

काळीमिरी

अति गरम किंवा अति थंड खाण्यामुळे होत असलेल्या दातदुखीमध्ये काळामिरी त्वरीत आराम देते. यासाठी काळीमिरी पावडर आणि मीठ सम प्रमाणात घ्या. त्यात काही पाण्याचे थेंब घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट वेदना होत असलेल्या जागेवर लावा आणि थोडा वेळ ठेवा. यामुळे दाताचे दुखणे बरे होईल.

बेकिंग सोडा लावा

बेकिंग सोड्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीसेप्टीक गुणधर्म असतात. कोमट पाण्यात बेकिंग सोडा टाकून गुळण्या करा. यामुळे दातातील वेदना कमी होतील. याशिवाय तुम्ही कापसामध्ये थोडासा बेकिंग सोडा टाकून वेदना होत असलेल्या दातावर ठेवू शकता.

पेरुची पाने

पेरुसोबतच पेरुची पानेही अतिशय फायदेशीर असतात. यात अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. दात दुखत असल्यास पेरुची ताजी पाने चावल्यामुळे वेदनेपासून आराम मिळतो. याव्यतिरिक्त तुम्ही पेरुची पाने पाण्यात उकळा आणि पाणी थंड झाल्यानंतर त्यात मीठ टाकून या पाण्याने गुळण्या करा. (These home remedies will eliminate toothache)

 

 

इतर बातम्या

Special Report: Gold Rate Today: सोने फेब्रुवारीच्या 20 दिवसांत 3292 रुपयांनी स्वस्त; येत्या आठवड्याभरात स्वस्त होणार की महागणार?

Coronavirus and Diabetes। कोरोनामुळे मधुमेहाचाही धोका, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI