AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Coronavirus and Diabetes। कोरोनामुळे मधुमेहाचाही धोका, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Coronavirus and Diabetes। कोरोनामुळे मधुमेहाचाही धोका, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका (the risk of diabetes due to corona, do not ignore these symptoms)

Coronavirus and Diabetes। कोरोनामुळे मधुमेहाचाही धोका, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
कोरोनाची चार नवी लक्षणे
| Updated on: Feb 21, 2021 | 5:37 PM
Share

नवी दिल्ली : बहुतेक लोक आता कोरोना विषाणूला गंभीरपणे घेत नाहीत परंतु अद्याप त्याचा धोका कमी झालेला नाही. कोरोनामुळे मधुमेहाची भीतीही वाढत आहे. एका अभ्यासानुसार कोविड 19 मुळे मधुमेहाची नवीन प्रकरणे वाढत आहेत. मधुमेह आणि हृदयाच्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूची लक्षणे अधिक तीव्र होतात. कोरोनाच्या सुरुवातीच्या दिवसांत मधुमेहाच्या रुग्णांचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. तथापि, गेल्या काही महिन्यांत अशा केसेस समोर आल्या आहेत ज्यात बऱ्याच रुग्णांना मधुमेह नव्हता मात्र कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मधुमेहही झाल्याचे निष्पन्न झाले आहे. (the risk of diabetes due to corona, do not ignore these symptoms)

काय म्हणाले प्रोफेसर रुबिनो?

किंग्ज कॉलेज लंडनचे एमडी प्रोफेसर फ्रान्सिस्को रुबीनो यांनी ‘द हेल्दी’ वेबसाईटला सांगितले की, मधुमेहाची कोणतीही हिस्ट्री नसतानाही कोविड 19ची गंभीर लक्षणे असलेल्या काही लोकांमध्ये मधुमेह आढळला आहे. मधुमेह एक सायलेंट आजार आहे. सामान्यत: जोपर्यंत याचे खास लक्षण दिसत नाही तोपर्यंत लोक त्याची तपासणी करीत नाहीत. बऱ्याच लोकांना अनेक वर्षांपासून मधुमेह असतो मात्र त्यांना कळतही नाही. म्हणून चेकअप आणि रुग्णालायत भरती करण्यापूर्वी डॉक्टर मधुमेहाची चाचणी जरुर करतात, असे डॉ. रुबिनो म्हणाले.

जगभरात 30 कोटींहून अधिक लोक मधुमेहग्रस्त

जगभरात जवळपास 30 कोटीपेक्षा अधिक लोक मधुमेहग्रस्त आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. ही एक प्रकारे दोन रोगांमधील लढाई असल्याचे रुबिनो म्हणाले. डायबिटीज, लठ्ठपणा आणि मेटाबॉलिज्म संदर्भात नोव्हेंबर 2020 मधील एका अभ्यासानुसार कोविड 19 च्या गंभीर प्रकरणांमध्ये 14.4 टक्के डायबिटीजच्या नव्या केसेस आढळल्या आहेत. हा अभ्यास केवळ तीन देशांतील नागरिकांवर करण्यात आला होता आणि हा आकडा जगभरात अधिक असू शकतो. आरोग्य तज्ञांच्या मते, मधुमेहाची नवीन प्रकरणे केवळ कोरोनाच्या गंभीर प्रकरणांमध्ये किंवा लक्षण नसलेल्या कोरोना प्रकरणांध्ये आढळत आहे.

या लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष

कोविड 19 मुळे मधुमेह का होतो याबाबत अद्याप सांगता येत नाही, मात्र अन्य व्हायरल इंफेक्शनप्रमाणे कोविड 19 ही प्रतिकारशक्तीवर परिणाम करते ज्यामुळे मधुमेह होतो. कोरोनाच्या रुग्णांनी काही विशेष लक्षणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दरम्यान आणि नंतर मधुमेहाच्या संभाव्य लक्षणांबद्दल जागरूक रहा, जसे वारंवार लघवी होणे, तहान-भूक वाढणे, खूप थकवा येणे याकडे दुर्लक्ष करु नका, असेही रुबिनो यांनी सांगितले आहे. तथापि यातील काही लक्षणे कोविड 19 ची ही असू शकतात, मात्र मधुमेहाची लक्षणे नाकारु शकत नाही. ज्यांना आधीच मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी कोविड 19 बाबत अधिक जागृक असले पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग ठेवा, मास्क घाला आणि लस घ्या. (the risk of diabetes due to corona, do not ignore these symptoms)

इतर बातम्या

आमच्याकडे पर्याय नाही, नाहीतर कोरोना वाढेल, हजारो लोकं रस्त्यावर मरतील : यशोमती ठाकूर

कामधेनू दत्तक ग्राम योजनेमार्फत शेतकऱ्यांना मोफत बियाणे व औषधे वाटप, कामधेनू योजना कोण राबवतं?, वाचा सविस्तर

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.