AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss : फक्त चालण्याने आणि धावण्याने वजन कमी होतं? ‘या’ काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती असणं गरजेचं

Weight Loss : आजच्या धावपळीच्या जिवनात अनेकांना एकच समस्या भेडसावते ती म्हणजे वाढतं वजन... आजच्या जीवनशैलीमुळे वजन वाढतं, अशात फक्त चालण्याने आणि धावण्याने वजन कमी होतं का? 'या' काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती असणं गरजेचं

Weight Loss : फक्त चालण्याने आणि धावण्याने वजन कमी होतं? 'या' काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती असणं गरजेचं
| Updated on: Sep 25, 2026 | 3:09 PM
Share

Weight Loss : आजच्या काळात लठ्ठपणा (obesity) ही एक मोठी समस्या बनली आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, बीपी, थायरॉईड आदी सर्व समस्या वेळेआधीच माणसाला घेरतात. लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग दोन्हीची गरज का आहे? हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे, तुमचं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी व्यायाम ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही व्यायामाचा विचार करता, तेव्हा धावणं, चालणं आणि सायकलिंग यांसारखे कार्डिओ व्यायाम सर्वात आधी मनात येतात. हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी कार्डिओ उत्तम आहे. परंतु केवळ कार्डिओ केल्याने तुमच्या शरीराला सर्व फायदे मिळतीलच असं नाही.

कार्डिओ व्यायामामुळे हृदय आणि स्नायूंची क्षमता वाढण्यास मदत होते. याचा मुख्य तोटा हा आहे की केवळ कार्डिओमुळे स्नायूंची ताकद आणि आकार वाढू शकत नाही. जरी यामुळे वजन कमी होण्यास मदत होत असली, तरी जर तुमचा आहार प्रथिनयुक्त असेल आणि तुम्ही वेट ट्रेनिंग करत नसाल, तर तुमचे स्नायू कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे, कार्डिओसोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा वेट ट्रेनिंगचा समावेश करणं आवश्यक आहे. स्नायूंना अधिक ताकद देण्यासाठी आणि वयानुसार येणारा स्नायूंचा अशक्तपणा टाळण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग खूप महत्त्वाचे आहे. वेट ट्रेनिंग आपल्या हाडांच्या आरोग्यासाठीही चांगले असते.

वजन उचलण्याचा व्यायाम टाळल्याने स्नायूंची ताकद आणि शरीराची एकूण कार्यक्षमता कमी होऊ शकते. यासाठी तुम्हाला जड जिम उपकरणांचा वापर करण्याची गरज नाही. डंबेल्स, रेझिस्टन्स बँड्स आणि स्क्वॅट्स यांसारखे साधे व्यायाम करता येतात. यामुळे शरीराचा तोल सुधारण्यासही मदत होईल.

केवळ कार्डिओ करून वजन कमी करता येते, असा विचार करणे योग्य नाही. चरबी कमी करण्यासाठी आणि स्नायू टिकवून ठेवण्यासाठी, तुम्ही कार्डिओसोबत वेट ट्रेनिंगचाही समावेश केला पाहिजे. निरोगी शरीरासाठी कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग दोन्ही सारखेच फायदे देतात. जेव्हा तुम्ही या दोन्हींचा एकत्रित वापर करता, तेव्हा त्याचे परिणाम दुप्पट होतात.

नवशिक्यांनी कार्डिओने सुरुवात करावी. नंतर, ते हळूहळू वेट ट्रेनिंगचा समावेश करू शकतात. चांगल्या आरोग्यासाठी प्रौढ व्यक्तीने आठवड्यातून किमान 150 मिनिटे कार्डिओ आणि किमान दोन दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग केले पाहिजे. व्यायामासोबतच चांगला आहार आणि नियमित विश्रांतीचे पालन करणे आवश्यक आहे. पण लाईफस्टाईलमध्ये कोणतेही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Follow Us
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना