Weight Loss | डाएटिंगवर आहात तर चुकूनही खाऊ नका ‘ही’ फळं, अन्यथा मेहनत जाईल वाया!

वजन कमी करण्यासाठी लोक बर्‍याच गोष्टी खाणे सोडून देतात. परंतु त्याच वेळी, आहार घेत असताना, आपण विशेषत: फळांचे सेवन वाढवतो आणि मग विचार करतो की, दुसर्‍या दिवशी लगेच आपले वजन कमी होईल.

Weight Loss | डाएटिंगवर आहात तर चुकूनही खाऊ नका ‘ही’ फळं, अन्यथा मेहनत जाईल वाया!
वाढलेले वजन
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 10:27 AM

मुंबई : वजन कमी करण्यासाठी लोक बर्‍याच गोष्टी खाणे सोडून देतात. परंतु त्याच वेळी, आहार घेत असताना, आपण विशेषत: फळांचे सेवन वाढवतो आणि मग विचार करतो की, दुसर्‍या दिवशी लगेच आपले वजन कमी होईल. परंतु असे होत नाही, कारण आपण अशी काही फळे खातो, ज्यात उच्च प्रमाणात कॅलरी असते (Do not eat these fruit while dieting for weight loss).

फळे नैसर्गिक आहार असू शकतात, परंतु काही फळे काळजीपूर्वक खायला हवीत. जर आपण वजन कमी करण्याच्या मार्गावर असाल, तर आम्ही तुम्हाला अशाच काही फळांबद्दल सांगणार आहोत, जे मर्यादित प्रमाणात न खाल्ल्यास वजन वाढू शकते.

केळे

केळीला एक सुपर-हेल्दी फळ मानले जाते. परंतु, ही एक अशी गोष्ट आहे जी आपण जास्त प्रमाणात घेऊ शकत नाही. केळी कॅलरींनी परिपूर्ण आहे आणि त्यात अत्यधिक नैसर्गिक साखर आहे. केळ्यामध्ये सुमारे 150 कॅलरीज असतात, तर सुमारे 37.5 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. म्हणून, जर तुम्ही दररोज 2-3 केळी खाल्लीत तर वजन वाढण्याची शक्यता असते. जर, तुम्हाला केळी खाण्याची इच्छा असेल तर दिवसभरात फक्त एक केळी खा.

द्राक्ष

द्राक्ष ही आपल्या आरोग्यासाठी चांगली मानली जाते. परंतु त्यामध्ये साखर आणि चरबी दोन्हीचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे तुमचे वजन वाढू शकते. 100 ग्रॅम द्राक्षांमध्ये 67 कॅलरी आणि 16 ग्रॅम साखर असू शकते, याचा अर्थ असा की नियमित सेवन केल्यास आपले वजन वाढू शकते. आपण वजन कमी करण्यासाठी डाएटवर असाल तर द्राक्ष खाऊ नका.

मनुका

खारीक किंवा मनुका सारख्या सुक्या मेव्यामध्ये कॅलरी जास्त असते, कारण त्यात पाण्याचे प्रमाण सर्वात कमी असते. असे म्हटले जाते की, एक ग्रॅम मनुकामध्ये जास्त कॅलरी असू शकतात. तर, एक कप किशमिशमध्ये 500 कॅलरी असतात आणि एक कप मुनक्यामध्ये 450 पेक्षा जास्त कॅलरी असतात, ज्यामुळे तुमचे वजन वाढू शकते. मर्यादित प्रमाणात सुका मेवा खाणे चांगले (Do not eat these fruit while dieting for weight loss).

एवाकॅडो

एवाकॅडोमध्ये जास्त कॅलरी असतात, म्हणून ते कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे. असे म्हणतात की या फळाच्या 100 ग्रॅममध्ये सुमारे 160 कॅलरी असतात. एवाकॅडो हा निरोगी चरबीचा चांगला स्रोत आहे. परंतु जास्त सेवन केल्याने आपले वजन वाढू शकते. याचा अर्थ असा नाही की, आपण आपल्या आहारातून ते पूर्णपणे काढून टाकळे पाहिजे, एवाकॅडो प्रमाणात खाणे चांगले ठरेल.

आंबा

आंबा सगळ्या फळांपेक्षा स्वादिष्ट असल्याने त्याला फळांचा राजा म्हणून ओळखळे जाते. एक कप आंब्याच्या तुकड्यात 99 कॅलरी असतात, जी मुख्यत: कर्बोदके असतात. यामुळे, आपल्याला एकाच खाण्यामध्ये 25 ग्रॅम कार्ब मिळतील. त्यापैकी, सुमारे 23 ग्रॅम नैसर्गिक साखर आणि सुमारे 3 ग्रॅम फायबर आहे. म्हणून, जर आपण वजन कमी करत असाल, तर आंबा खाणे टाळावे.

(Do not eat these fruit while dieting for weight loss)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.