Weight Loss | वजन वाढवण्यासाठीच नव्हे तर, वजन कमी करण्यासाठीही ‘केळी’ फायदेशीर!

केळी केवळ वजन वाढवतच नाही, तर वजन कमी करण्यातही प्रभावी ठरतात.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:12 PM, 19 Jan 2021
Weight Loss | वजन वाढवण्यासाठीच नव्हे तर, वजन कमी करण्यासाठीही ‘केळी’ फायदेशीर!

मुंबई : बऱ्याचदा आपल्या घरचे आपल्याला बारीक झाला आहात, रोज केळी दुधासोबत खा, असा सल्ला देताना आपण ऐकले असेल. होय, दूध आणि केळ्याला फार पूर्वीपासून वजन वाढवण्याचा एक अतिशय प्रभावी मार्ग मानला जातो. परंतु, आपणास माहित आहे का की, केळी केवळ वजन वाढवतच नाही, तर वजन कमी करण्यातही प्रभावी ठरतात (Banana Helpful for weight loss).

ज्या लोकांना कसरत किंवा व्यायाम करण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही, घरी बसून बसून शरीरावर चरबी वाढली आहे, त्यांनी दररोज केळी खाल्ल्यानंतर सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यावे. यासह, काही दिवसात त्यांची अतिरिक्त चरबी कमी होण्यास सुरुवात होईल आणि काही दिवसांत शरीर पुन्हा तंदुरुस्त होईल. पण याबरोबरच इतरही काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. चला तर त्यांच्याबद्दल जाणून घेऊया…

नाश्ता म्हणून केळी खा.

केळी ऊर्जेचा सर्वोत्तम स्रोत आहे. यात ग्लायसेमिक आणि स्टार्चचे घटक आहेत. दररोज सकाळी न्याहारी म्हणून एखादे केळे खाल्ले पाहिजे. रिकाम्या पोटी केळे खाल्ल्याने दिवसभर शरीर ताजेतवाने राहिल. न्याहारी म्हणून तुम्ही एक किंवा दोन केळी खाऊ शकता. केळी खाल्ल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यायले पाहिजे. यामुळे आपले पाचन तंत्र सुधारते आणि शरीरात अतिरिक्त चरबी वाढवत नाही. दररोज सकाळी 8 च्या आधी केळ्याचा नाश्ता करा (Banana Helpful for weight loss).

दुपारी 12 ते 1 या दरम्यान जेवा.

सकाळी 8 वाजताच्या न्याहारीनंतर दुपारी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान दोन चपाती, डाळ, भाज्या, दही आणि सलाड खा. भात खाणे टाळा. जर आपल्याला भाताची सवय असेल, तर आपण ब्राऊन राईस खाऊ शकता. त्यानंतर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एक फळ खा. रात्रीच्या जेवणाची वेळ 8 ते 9 दरम्यानची असावी. रात्रीच्या जेवणामध्ये हिरव्या भाज्या आणि एक किंवा दोन चपाती खा. जर तुम्हाला जास्त भूक लागली असेल, तर अधिकची चपाती खाण्याऐवजी जास्त भाज्या खा. त्यानंतर दोन तासांनी किंवा रात्री झोपण्यापूर्वी मलई नसलेले एक कप दूध प्या.

खाल्ल्यानंतर अर्ध्या तासाने कोमट पाणी प्या.

खाण्याच्या अर्ध्या तासानंतरच पाणी प्या आणि शक्यतो कोमट पाणी प्या. यामुळे आपले अन्न सहज पचेल आणि पाचन तंत्र देखील चांगले होईल. जर तुम्हाला जेवणाच्या दरम्यान तहान लागली असेल तर, आपण कोमट पाण्याचे एखाद-दोन घोट घेऊ शकता. खाल्ल्यानंतर कमीतकमी अर्धा तास चाला. शक्य नसल्यास किमान वज्रासनवर काहीवेळ बसावे. लगेच झोपू नये.

(Banana Helpful for weight loss)

हेही वाचा :