AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलांना चुकूनही या 3 तीन गोष्टींवरून कधीच ओरडू नका, अन्यथा मनावर होईल वाईट परिणाम

बऱ्याचदा पालक आपल्या मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी ओरडत असतात. तर कधी कधी फटकारतात. ते वेळ किंवा परिस्थिती पाहत नाहीत, मात्र यामुळे मुलांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असते.

मुलांना चुकूनही या 3 तीन गोष्टींवरून कधीच ओरडू नका, अन्यथा मनावर होईल वाईट परिणाम
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 28, 2025 | 7:11 PM
Share

लहान मुलांचे मन खूप नाजूक असते. त्यामुळे कधीकधी कठोरपणा देखील त्यांच्या मनावर खोलवर परिणाम करतो. आजच्या बदलत्या जीवनशैलीत आणि स्पर्धेच्या युगात मुलांची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कारण प्रत्येक छोटी गोष्ट मुलांच्या मनावर परिणाम करते. कारण यात आता मुलांवर पुढे जाण्याचा दबावही पूर्वीच्या तुलनेत खूप वाढला आहे, त्यामुळे पालकत्वाच्या पद्धती बदलणे स्वाभाविक आहे. आताच्या या स्पर्धेच्या जगात मुलाला प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांना मारहाण करणे किंवा त्यांच्याशी खूप कठोर वागणे टाळले पाहिजे. जर तुम्‍ही चुकीच्या वेळी किंवा परिस्थितीत ओरडले तर मुलांच्या शिकण्याच्या कौशल्यावर वाईट परिणाम होतो. तर आजच्या या लेखात आपण जाणून घेऊ की कोणत्या तीन वेळी मुलांना ओरडू किंवा फटकारू नयेत…

तुमची मुलं जेव्हा अभ्यासाच्या किंवा इतर कोणत्या तणावात असतील तर त्या चुकीच्या वेळी ओरडल्याने त्यांचा शारीरिक विकासच थांबत नाही तर त्यांच्या विचार करण्याच्या आणि समजून घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. त्यामुळे मुले चिडचिडे होतात आणि त्यांमुळे मुलं तुमच्या कडे कोणतीच गोष्ट शेअर करत नाही, त्यामुळे मुलांना ताण आणि चिंता यासारख्या समस्यांनी वेढले जातात.

1. सकाळी उठल्यावर ओरडू नये

सकाळी उठल्यानंतर कधीकधी मोठयांना देखील असे होते की सकाळी सकाळी कोणाशी बोलू नये. कारण सकाळची सुरूवात आपल्या मनावर व मुडवर परिणाम करतो. म्हणून सकाळची वेळ शांतता आणि आनंदाने भरलेली असावी. सकाळी, लोकं शाळेच्या घाईत मुलांना जबरदस्तीने उठवतात आणि या वेळी बरेचदा त्यांच्यावर चिडतात, परंतु ही वेळ सर्वात महत्वाची असते, जेव्हा तुम्ही मुलांशी प्रेमाने वागता.

शाळेतून परत आल्यावर ओरडू नये

जेव्हा मूले शाळेतून परत येतात तेव्हा अनेक पालकांना त्यांना लगेच प्रश्न विचारण्याची सवय असते. जसे की आज शाळेत काय शिकला, अभ्यास किती दिला हे विचारत असतात. परंतु असे प्रश्न किंवा फटकारणे मुलांच्या मनावर त्रास होऊ शकतो, कारण शाळेतून येतानामुलं खूप थकलेले असतात. शाळेतून परत आल्यानंतर, कपडे बदलल्यानंतर मुलाला हेल्दी अन्न आणि पिण्यासाठी पाणी द्यावे.

रात्री झोपताना ओरडू नका

झोप ही मुलाच्या विकासात खूप मोठी भूमिका बजावते. जर तुमचे मूल रात्री उशिरापर्यंत जागे राहिले किंवा झोपताना त्यांच्यावर ओरडले तर त्याचा शारीरिक आणि मानसिक विकासावर परिणाम होऊ शकतो. म्हणून, मुलाला नेहमी प्रेमाने झोपवावे आणि यावेळी त्यांना कधीही फटकारण्याची चूक करू नये.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.