AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दररोज मेकअप करणं योग्य की अयोग्य ? त्वचेवर काय होतात परिणाम ?

मेकअप हा चेहऱ्याचं बाह्य सौंदर्य वाढवतो. पण गरजेपेक्षा जास्त मेकअप करणं किंवा दररोज मेकअप करणं याचा आपल्या त्वचेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

दररोज मेकअप करणं योग्य की अयोग्य ? त्वचेवर काय होतात परिणाम ?
| Updated on: Mar 18, 2024 | 2:10 PM
Share

मुंबई | 18 मार्च 2024 : मेकअप करणं हे बहुतांश महिलांन आवडतं, त्यामुळे चेहऱ्याचं बाह्य सौंदर्य वाढवतं. आयब्रो पेन्सिल, आयशॅडो, लिपस्टीक, ब्लशर, स्किन टोनिंग अशा विविध मेकअप प्रॉडक्ट्सचा बऱ्याच जणी वापर करतात. काहीजणी तर नियमितपणे मेकअप करतात. मात्र दररोज मेकअप केल्याने आपल्या त्वचेवर कसा परिणाम होतो याची तुम्हाला कल्पना आहे का ? ते माहीत नसेल तर हे नक्की वाचा. जास्त वेळ मेकअप लावल्याने त्वचेवर विपरीत परिणाम होतो. मेकअप त्वचेसाठी कसा घातक ठरू शकतो हे जाणून घेऊया.

त्वचेवर पडतो नकारात्मक प्रभाव

मेकअप केल्याने चेहऱ्याचे सौंदर्य वाढते हे स्वाभाविक आहे. पण या मेकअपमुळे तुमच्या त्वचेचे कधी नुकसान होते हे तुम्हाला कळतही नाही. सध्याच्या या फॅशनच्या जमान्यात लहान मुलीही रोज मेकअप करतात . मात्र त्यामध्ये अनेक हानिकारक घटक असतात. लहान वयात रोज मेकअप केल्यास भविष्यात त्वचा खराब होऊ शकते. दररोज मेकअप केल्याने अनेक नकारात्मक परिणाम होतात. त्याच्या वापरामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.

त्वचेसाठी मेकअप ठरतो धोकादायक

दररोज मेकअप करणे ही अनेक महिलांची सवय झाली आहे. पण चेहऱ्यावर सतत मेकअप लावल्याने त्वचेची छिद्रे बंद होतात, ज्यामुळे त्वचेच्या पेशींचे नुकसान होते. इतकेच नाही तर चेहऱ्यावर मुरुम, पिंपल्स आणि ॲलर्जी सारख्या समस्या उद्भवू लागतात. ज्यामुळे तुमचा संपूर्ण चेहरा लाल होऊ लागतो. रोजच्या मेकअपमुळे त्वचेला श्वास घेणेही कठीण होऊ शकते. याशिवाय त्वचेचा रंग फिका पडायला लागतो. बाजारात उपलब्ध असलेल्या काही मेकअपमध्ये केमिकल असल्याने त्वचेशी संबंधित समस्या वाढू शकतात.

या टिप्स करा फॉलो

– दररोज मेकअप करू नका. कधीतरीच मेकअप करत जा.

– खूप भारी, हेवी मेकअप करणे टाळा. हलका मेकअप करावा, ज्यामुळे त्वचेचे नुकसान होत नाही.

– झोपण्यापूर्वी मेकअप स्वच्छ करा. त्यासाठी मेकअप रिमूव्हरचा अवश्य वापर करा. नंतरही चेहरा स्वच्छ धुवा.

– मेकअप रोज करत असाल तर मेकअप काढल्यावर चांगले मॉयश्चरायझर लावा.

– भरपूर पाणी प्या. स्किन हायड्रेटेड राहील.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.